Triumph Daytona 660 Gets 1 Lakh Discount: स्पोर्ट्स बाइक प्रेमींसाठी ट्रायम्फकडून एक चांगली बातमी मिळाली आहे. कंपनीने ट्रायम्फ डेटोना ६६०वर तब्बल एक लाख रूपयांची रोख सवलत ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर सध्या अंधेरी, मुंबई आणि दिल्ली इथल्या निवडक ट्रायम्फ डीलरशिपवर उपलब्ध आहे. असं असलं तरी ट्रायम्फ इंडियाने अद्याप देशभरात अधिकृत घोषणा केलेला नाही.
ट्रायम्फ डेटोना ६६०ची नवीन किंमत (सवलतीनंतर)
- ट्रायम्फ डेटोना ६६०च्या सध्याच्या एक्स शोरूम किंमत
- पांढरा रंग- ९.८८ लाख रूपये
- लाल आणि काळा रंग- १०.०३ लाख रूपये
१ लाख रूपयांच्या सवलतीनंतर ही बाईक आता थेट कावासाकी आणि होंडा स्पोर्ट्स बाईकशी स्पर्धा करते, त्यांच्या किमती पुढीलप्रमाणे…
- कावासाकी निन्जा 650- ७.७७ लाख रूपये
- होंडा CBR650R- ११.१६ लाख रूपये
दिल्लीतील एका डीलरच्या मते, डेटोना ६६०ची डिस्काउंट नंतरची ऑन रोड किंमत ११.४० लाख रूपयांपासून सुरू होते आणि ही ऑफर फक्त MY2025 मॉडेलवर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
ट्रायम्फ डेटोना ६६० इंजिन आणि कामगिरी
डेटोना ६६०मध्ये ६६० सीसी इनलाइन ट्रिपल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे जे ११,२५० आरपीएमवर ९५ एचपी आणि ८,२५० आरपीएमवर ६९ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन स्लिप असिस्ट क्लचसह ६-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
ट्रायम्फ डेटोना ६६०ची वैशिष्ट्ये
या स्पोर्ट्स बाईकमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स उपलब्ध आहेत
- शोवा ४१ मिमी यूएसडी फ्रंट फोर्क
- मागील मोनोशॉक सस्पेंशन
- ड्युअल ३१० मिमी फअरंट डिस्क ब्रेक्स
- २२० मिमी रियर डिस्क
- राईड बाय राइड वायर थ्रॉटल
- तीन रायडिंग मोड
- एडजेस्टबल ट्रॅक्शन कंट्रोल
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
ही ऑफर किती काळ असेल?
हे एक लाखाचं डिस्काउंट फक्त MY2025 Daytona 660 मॉडेलवर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप या ऑफरची शेवटची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक ग्राहकांनी त्यांच्या जवळच्या ट्रायम्फ शोरूमशी त्वरित संपर्क साधावा.
१ लाख रूपयांच्या मोठ्या सवलतीसह ट्रायम्फ डेटोना ६६० आता पूर्वीपेक्षाही अधिक परवडणारी आहे. याची किंमत आता कावासाकी निन्जा ६५०च्या अगदी जवळ आहे. त्यामुळे या कॅटेगरीमधील स्पर्धा आणखी एक्सायटिंग आहे. जर तुम्ही एक पॉवरफुल, स्टायलिश आणि वैशिष्ट्यपूर्ण स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्कृष्ट संधी आहे.
