Triumph speed T4 launched in India: ट्रायम्फने भारतात आपल्या 400 सीसी सीरिजमधील लेटेस्ट ट्रायम्फ स्पीड टी4 ही बाईक लाँच केली आहे. ही एक अतिशय हाय-टेक-क्लासिक बाईक आहे; जी केवळ दिसायलाच स्टायलिश आणि ट्रेंडीच नाही, तर तिचा परफॉर्मन्सही दमदार आहे. या लेखातून आपण या बाईकची किंमत, फीचर्स आणि बरंच काही जाणून घेणार आहोत.

किंमत आणि फीचर्स (Triumph speed T4 Price and Features)

या नव्याकोऱ्या Triumph Speed ​​T4 च्या किमतीबद्दल बोलायचं झालं, तर त्याची सुरुवातीची किंमत ₹ 2.17 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. पर्ल मेटॅलिक व्हाइट (Pearl Metallic White), कॉकटेल वाइन रेड (Cocktail Wine Red) व फँटम ब्लॅक (Phantom Black) अशा तीन आकर्षक रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध असणार आहे. नवीन ट्रायम्फ स्पीड T4 ही स्पीड 400 सारख्याच एलिमेंट्सवर आधारित आहे; ज्यात आकर्षक ग्राफिक्ससह रिडिझाईन केलेली इंधनाची टाकी, एक अपडेटेड सीट व नवीन बार-एंड मिरर यांचा समावेश आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हेही वाचा… Maruti Swift CNG vs Tata Tiago CNG: कोणती हॅचबॅक कार आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही…

आपल्या विटेंज स्टाईलनुसार, Triumph Speed ​​T4चे speed 400 सारखेच आर्किटेक्चर आहे. ही बाईक 398 cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे; जी 30.6 bhp आणि 36 Nm टॉर्क जनरेट करते, .हा टॉर्क 6-स्पीड ट्रान्स्मिशन या माध्यमातून दिला जातो. तसेच उत्कृष्ट लो-एंड टॉर्कसाठी डिझाईन केलेले इंजिन केवळ 2500 rpm वर त्याच्या 85% पीक टॉर्क प्रदान करते.

हेही वाचा… TATA Electric Car Discounts: सणासुदीला कार खरेदी करताय? Tata Motors देणार ‘या’ इलेक्ट्रिक कार्सवर तब्बल ३ लाखांचं डिस्काउंट अन् ही खास ऑफर

संपूर्ण एलईडी लाइटिंग, 17-इंच अलॉय व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनने व 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि एक रेअर मोनोशॉकसह प्रगत सस्पेंशन असणारी ही मोटरसायकल हाय-टेक फीचर्ससह सुसज्ज आहे.

हेही वाचा… New Hero Destini 125 vs TVS Jupiter 110: दोन्ही स्कूटर्स झाल्या नव्या फिचर्स अन् डिझाईनस लॉंच! कोणती स्कूटर ठरणार वरचढ? घ्या जाणून…

ब्रेकिंगसाठी ही बाईक समोरील 300 मिमी डिस्कवर आणि मागील बाजूस 230 मिमी डिस्कवर अवलंबून असते, जी चांगल्या सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल ABS सह परिपूर्ण होते.