Tubeless Tyre vs Tube Tyre:  कार आणि मोटरसायकलमध्ये दोन प्रकारचे टायर वापरले जातात. एक टायर ज्यामध्ये ट्यूब असते आणि दुसरा ट्यूबलेस असतो. मात्र, आता कंपन्या बहुतांश वाहनांमध्ये फक्त ट्यूबलेस टायर वापरतात. याची अनेक कारणे आहेत. आता अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला गाडीचे टायर बदलावे लागतील, तुम्हाला ट्यूबलेस घ्यायचे आहे की, ट्यूबसह. तुम्ही या दोन्ही प्रकारच्या टायरचे फायदे आणि तोटे समजून घेऊन निर्णय घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला कोणते टायर वापरणे फायदेशीर ठरतील याची माहिती देणार आहोत.

टायर्सचे प्रकार

Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

ट्यूबलेस बाइक टायर ट्यूबशिवाय काम करते. हवा थेट टायरमध्ये पंप केली जाते, याचा अर्थ रिमला हवाबंद सेटिंग आहे. ट्यूबलेस टायर दोन प्रकार असतात. यात बायस-प्लाय आणि रेडियल. ट्यूब-टाइप टायरमध्ये ट्यूब असते जी टायरमध्ये हवेचा दाब ठेवते. हे सॉफ्ट कंपाऊंडचे बनलेले असतात. ज्यामुळे ते कठीण बनतात आणि त्या टायरचे आयुष्य देखील वाढते. ट्यूब आणि टायर एकमेकांशी जोडलेले नसल्यामुळे, टायर आणि चाकामधील बाँडिंग हवाबंद नसते.

(आणखी वाचा : E-cycles: रोजचा प्रवास करायचाय, e-cycle स्वारी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या ‘या’ चार गोष्टींबाबत!)

ट्यूब टायरचे फायदे

ट्यूब टाईप टायरचे पंक्चर दुरुस्त करणे सोपे असते. तसेच पंचर झाला तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. तसेच हवेच्या दाबाची समस्या येत नाही.

ट्यूब टायरचे तोटे

ट्यूब टायरचे जसे फायदे आहेत, तसेही तोटे आहेत. यात टायरच पंक्चर होण्याचा जास्त धोका असतो. टायर आणि ट्यूब वेगळे असल्याने हे टायर जड असतात. एकदा पंक्चर झाल्यानंतर, ते लगेचच सपाट होते, ज्यामुळे तुम्हाला पार्क करण्यासाठी किंवा दुरुस्तीचे दुकान शोधण्यासाठी वेळच मिळत नाही.

(आणखी वाचा : रस्त्याच्या कडेला असलेले माइलस्टोन्स वेगवेगळ्या रंगांचे का असतात? काय आहे यामागील गुपित, वाचा सविस्तर )

ट्यूबलेस टायरचे फायदे
ट्यूबलेस टायरची पंक्चर होण्याची शक्यता कमी असते. हा टायर बराच काळ टिकतो. पंक्चर झाल्यावर टायरमधून हवा हळूहळू बाहेर येते. हे तुम्हाला थांबण्यासाठी चांगला वेळ देते. ट्यूबलेस टायरमुळे वाहन हलके राहते. त्याची किंमत जवळजवळ ट्यूब-टाइप टायर सारखीच असतात.

ट्यूबलेस टायरचे तोटे
ट्युबलेस टायर्सचे अनेक मॉडेल्स महागडे असतात. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास, ते सहजपणे दुरुस्त केले जाऊ शकत नाही. या टायर्समध्ये साइड कटच्या तक्रारी अधिक आढळतात.