दुचाकी कंपनी TVS मोटरने बाईक-टॅक्सी प्लॅटफॉर्म Rapido सोबत व्यावसायिक वाहतुकीच्या क्षेत्रात परस्पर हितसंबंध आणि सहकार्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. दोन्ही कंपन्या वाहतूक व्यवस्था आणि अखंड तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची ताकद एकत्र आणतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

करारानुसार, कंपन्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा समावेश करतील. यामुळे कंपनी पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहन विभागांमध्ये देखील विस्तारित होईल.

canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

TVS मोटर कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले की, “रॅपिडोने ‘कॅप्टन’ आणि ‘रायडर्स’चा मजबूत युजर्सचा आधार तयार केला आहे आणि आज भारतातील आघाडीचे बाइक-टॅक्सी प्लॅटफॉर्म बनले आहे. आम्हाला खात्री आहे की या टाय-अपमुळे आम्ही उच्च दर्जाची, टीव्हीएस इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमधील कनेक्टेड उत्पादने आणि आमच्या गटाकडून वित्तपुरवठा करून मोबिलिटी आणि उच्च-सार्वजनिक विभागामध्ये आमची पोहोच वाढवू शकू.”

आणखी वाचा : ही इलेक्ट्रिक स्कूटर अँटी थेफ्ट अलार्म सारख्या हाय-टेक फिचर्ससह सिंगल चार्जमध्ये देते मोठी रेंज, किंमत फक्त ५१ हजार

Rapido चे सह-संस्थापक अरविंद संक म्हणाले की, “ही असोसिएशन आम्हाला आमच्या क्षमता मजबूत करण्यात आणि आमच्या इलेक्ट्रिक बाईकचा ताफा वाढवण्यास मदत करेल.” यापुढे बोलताना ते म्हणाले की, “लाखो भारतीयांना परवडणाऱ्या, आरामदायी, सोयीस्कर आणि सुरक्षित पर्यायी वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करण्यात मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची उपस्थिती भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये विस्तारित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.”