देशातील बाइक सेगमेंटमध्ये १०० सीसी इंजिनपासून ६५० सीसी इंजिनपर्यंतच्या बाइक्सची श्रेणी आहे. यामध्ये आम्ही २०० सीसी इंजिन बाइक्सबद्दल सांगणार आहोत. या बाइक्स मध्यम श्रेणीत येतात. जर तुम्हाला २०० सीसी इंजिन बाइक घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात. या तुलनेसाठी TVS Apache RTR 200 4V आणि Hero X Plus 200 या दोन बाइक आहेत. यामध्ये तुम्हाला या दोन्ही बाइकच्या किमतीपासून ते इंजिनपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेता येतील.

Hero XPulse 200: हिरो एक्स प्लस २०० बाइक ही एक प्रीमियम अॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइक आहे. कंपनीच्या लोकप्रिय बाइक्सच्या यादीत येते. कंपनीने या बाइकचे दोन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. बाइकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात १९९.६ सीसीचे इंजिन आहे जे १९.१ पीएस पॉवर आणि १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, बाइक ५१.५९ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो मोटोकॉर्पनेही बाईक रु. १.२३ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच केली आहे जी टॉप व्हेरियंटमध्ये रु. १.३२ लाखांपर्यंत जाते.

How many times we should boil milk know Correct Way To Boil Milk
Milk Boiling Tips: दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळा उकळावे, जाणून घ्या
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
How Much Green Tea Should One Drink In A Day?
Green Tea: ग्रीन टी दिवसातून किती वेळा घ्यावी? ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…

Mahindra Thar 5 Door Variant लवकरच होणार लाँच, किमतीपासून वैशिष्ट्ये जाणून घ्या

TVS Apache RTR 200 4V: टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही ही एक वेगवान आणि आकर्षकपणे डिझाइन केलेली बाइक आहे, कंपनीने आतापर्यंत या बाइकचे दोन प्रकार बाजारात लाँच केले आहेत. या बाइकमध्ये सिंगल सिलेंडरसह १९७.७५ सीसी इंजिन आहे. हे इंजिन २०.८२ पीएस पॉवर आणि १६.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, अपाचे आरटीआर २०० बाइक ३५ किलोमीटर प्रति लिटर एवढा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. अपाचे आरटीआर २०० ४ व्ही कंपनीने १.३८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना १.४३ लाख रुपयांपर्यंत जाते.