टू व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये लांब मायलेज देणार्‍या स्कूटर मोठ्या संख्येने आहेत. यामध्ये हिरो, टीव्हीएस, होंडा आणि सुझुकी या कंपन्यांच्या स्कूटर्सची संख्या सर्वाधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायलेज स्कूटरच्या रेंजमध्ये आज आम्ही TVS ज्युपिटर स्टँडर्ड व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत जी त्याच्या सेगमेंटमध्ये तसेच त्यांच्या कंपनीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरच्या यादीमध्ये येते. कमी किमतीत चांगल्या मायलेजसाठी या स्कूटरला पसंती दिली जाते.

TVS ज्युपिटर स्टँडर्डची सुरुवातीची किंमत ७२,५७१ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड असताना ८७, ००८ रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला ही स्कूटर विकत घ्यायची असेल, तर ती खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लॅन इथे जाणून घ्या.

आणखी वाचा : Renault Kwid vs Maruti S Presso : ५ लाखांच्या बजेटमध्ये स्टाईल, मायलेज आणि फीचर्समध्ये कोणती उत्तम? जाणून घ्या

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय प्लॅननुसार, जर तुम्ही ही स्कूटर खरेदी केली तर बँक यासाठी ७८,००८ रुपये कर्ज देईल. हे कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला किमान डाउन पेमेंट रुपये जमा करावे लागतील. कर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा २,५०६ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

टीव्हीएस ज्युपिटर स्टँडर्डवर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ३ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के व्याजदर आकारेल.

आणखी वाचा : केवळ ७० हजारात खरेदी करा Maruti WagonR, वाचा संपूर्ण ऑफर

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर योजनेचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही या TVS ज्युपिटरचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

TVS Jupiter मध्ये कंपनीने १०९.७ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.८८ PS पॉवर आणि ८.८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही TVS ज्युपिटर ६४ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs jupiter std finance plan with down payment 9000 and emi read complete scooter details prp
First published on: 04-08-2022 at 21:14 IST