Special edition apache rtr 160 4v : १५० सीसी सेगमेंटमध्ये वर्चस्वाची लढाई आणखी रंगणार आहे. कारण बजाजने अलिकडेच पल्सर पी १५० लाँच केली. ही बाईक अपाचे आरटीआर १६० २ व्ही, यामाहा एफझेड आणि हिरो एक्सट्रिम १५० बाईकला तगडे आव्हान देईल, असे समजले असताना आता अपचानेही ग्राहकांसाठी Special edition RTR 160 4V लाँच केली आहे. या बाईकची किंमत १.३० लाख असून, ही पल्सरला जोरदार आव्हान देण्याची शक्यता आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीने नवीन फीचर्ससह ही बाईक उपलब्ध केली आहे. बाईकमध्ये १५९.७ सीसी, ऑइल कुल्ड, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे, जे ५ स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. बाइकला नवीन पर्ल व्हाईट रंग मिळाला असून ती ड्युअल टोन सीट, अ‍ॅडजस्टेबल क्लच, ब्रेक लिव्हर्स आणि रिअर रेडिअल टायर्ससह उपलब्ध करण्यात आली आहे.

Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
pune caste validity certificate marathi news
पुणे: जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम… काय करावे लागणार?
PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २५ रिक्त पदांची भरती, ३० हजार रुपये मिळणार पगार
a man find out jugaad of cold water for a bath in summer
Jugaad Video : उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्यासाठी केला अनोखा जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

(कमाई होईल आणि कौशल्यही दिसेल; जिओच्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये काय आहे खास? जाणून घ्या)

स्पेशल एडिशन आरटीआर १६० ४व्ही मध्ये हलके बुलपप मफलर देण्यात आले आहे जे आरटीआरच्या एक्झॉस्टची कार्यक्षमता वाढवते. यामुळे वाहनाचे पावर टू वेट रेशिओ वाढले असून १ किलो वजन कमी झाले आहे. बाईक मॅट ब्लॅक स्पेशल एडीशन पेंट स्किम आणि नवीन पर्ल व्हाईट रंग पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

बाईकमध्ये तीन राईडिंग मोड्स मिळत आहेत ज्यामध्ये अर्बन, स्पोर्ट आणि रेनचा समावेश आहे. अर्बन आणि रेन मोडमध्ये सर्वोच्च स्पीड १०३ किमी प्रति तास पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. तर स्पोर्ट्स मोडमध्ये सर्वोच्च स्पीड ११४ किमी प्रति तास पर्यंत वाढवण्यात आली आहे.

(यूट्यूबची मोठी कारवाई! भारतातील १७ लाख व्हिडिओ हटवले, ‘हे’ आहे कारण)

बाईकमधील इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इतर माहितीसह गेअर शिफ्ट इंडिकेटरही दाखवतो. बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्पऐवजी नवीन एलईडी डेटाईम रनिंग लॅम्प देण्यात आले आहेत. ब्रेकिंग सिस्टिमबाबत बोलायचे झाल्यास बाईकला पुढे २७० एमएम पेटल डिस्क आणि मागे २०० मिटर पेटल डिस्क देण्यात आले आहे. बाईकला पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे मोनोशॉक देण्यात आले आहे.