टीव्हीएस मोटर कंपनीने स्विस ई-मोबिलिटी ग्रुप एजी (SEMG) मध्ये ७५ टक्के हिस्सा घेतला आहे. ही इलेक्ट्रिक बाइक बनवणारी स्विस कंपनी आहे. कंपनी १० कोटी डॉलर्सचा हा करार झाला आहे. टीव्हीएस मोटार (सिंगापूर) लिमिटेडमार्फत हे अधिग्रहण पूर्णपणे रोखीने झाले. “कंपनीने स्विस ई-बाईक कंपनी SEMG चे अधिग्रहण केले आहे. हे अधिग्रहण १० कोटी डॉलर्स मुल्यांकनात झाले आहे. अधिग्रहणामुळे टीव्हीएस मोटरच्या ई-पर्सनल मोबिलिटी उत्पादनांसाठी वचनबद्धता वाढवते. वेगाने वाढणाऱ्या ई-बाईक सेगमेंटमध्ये आम्ही आमची उपस्थिती मजबूत करत आहोत”, असं सुदर्शन वेणू, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, टीव्हीएस मोटर कंपनी यांनी सांगितले. कंपनी उर्वरित भागभांडवल विकत घेण्याचा विचार करत आहे, असंही त्यांनी पुढे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय या वृत्तसंस्थेने वेणूच यांचा संदर्भ देत सांगितले की, ई बाइक उत्पादने बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तसेच व्यापक बांधिलकीचा भाग आहे. केवळ युरोपमध्येच नव्हे तर भारतासह इतर बाजारपेठांमध्येही ब्रँड्सच्या वाढीला वाव आहे. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत लोकांना हे ब्रँड भारतात दिसतील. टीव्हीएस यावर्षात केवळ ई-बाईक विभागातून १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई करत आहे.

SEMG चे स्वित्झर्लंडमध्ये ३८ मोठे रिटेल स्टोअर्स आहेत. तेथून सिलो, सिंपल आणि जेनिथ सारख्या ब्रँडची विक्री करते. स्विस बाजारपेठेत त्याचा सुमारे २० टक्के हिस्सा आहे. स्विस मूळ कंपनीच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये चार गोष्टी आहेत. यामध्ये अॅलेग्रो व्यतिरिक्त सिलो, सिंपल आणि जेनिथ यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर कंपनीचे दोन ऑनलाइन प्लॅटफॉर्मही आहेत. दुसरीकडे, टीव्हीएसने यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये स्विस इलेक्ट्रिक सायकल आणि पर्सनल मोबिलिटी कंपनी EGO Movement मधील ८० टक्के हिस्सा सुमारे .१८ कोटी डॉलर्समध्ये खरेदी केला होता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs motor company acquisition of a 75 percent stake in the swiss e mobility group rmt
First published on: 28-01-2022 at 16:42 IST