Premium

‘या’ कारणामुळे TVS मोटरने इलेक्ट्रिक बाईकची किंमत २२ हजारांनी वाढवली, जाणून घ्या iQubeची नवीन किंमत

TVS मोटरने इलेक्ट्रिक बाईकची किमंत २२ हजारांनी वाढवली.

TVS Motor has increased the price of iQube
इलेक्ट्रिक बाईकच्या किमती वाढल्या. (Photo : Jansatta)

फेम २ या इलेक्ट्रिक बाईकवर मिळणारी सबसिडी कमी केल्याने, इलेक्ट्रिक बाईकच्या किमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक बाईकचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बाईकच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी एक TVS मोटर आहे, त्यांनी आपल्या एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube च्या किमती सुमारे २२ हजार रुपयांनी वाढवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेम २ सबसिडीमध्ये काय बदल झाला?

केंद्र सरकाने इलेक्ट्रिक बाईकचा वापर वाढावा आणि विक्रीला प्रोत्साहन मिळावे यासाठी फेम २ अनुदान जाहीर केले होते. या अनुदानांतर्गत इलेक्ट्रिक बाईकला प्रति किलोवॅट १५ हजारांची सबसिडी देण्यात येत होती. सरकारने ही सबसिडी कमी केल्यानंतर इलेक्ट्रिक बाईकवरील सबसिडी १५ हजारांवरुन १० हजार प्रति किलोवॅट करण्यात आली आहे. तसेच, कमाल अनुदानाची रक्कम आता एक्स-फॅक्टरी किंमतीच्या १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे, जी आधी ४० टक्के होती.

१ जूनपासून TVS iQube ची नवीन किंमत किती?

हेही वाचा- Car Sales in May 2023: मे महिन्यात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त गाड्या

TVS Motor ने iQube इलेक्ट्रिक बाईकच्या किंमती १७ ते २२ हजारांपर्यंत वाढवल्या आहेत. ही वाढ या स्कूटरच्या प्रकारावर अवलंबून असली तरी. TVS iQube च्या नवीन किमती १ जून २०२३ पासून लागू होणार आहेत. FAME-II सबसिडी कमी होण्यापूर्वी, TVS iQube ला ५१ हजार रुपये सबसिडी मिळत होती.

सबसिडी वजा केल्यानंतर, फेम २ TVS iQube ची बेस मॉडेलची किंमत १ लाख ७४ हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) होती, जी एस प्रकारासाठी १ लाख ८५ लाख झाली. आधीच्या सबसिडीसह आयक्यूब स्टँडर्ड एडिशनची दिल्लीतील सुरुवातीची किंमत १ लाख ६ हजार होती. नवीन किंमत लागू झाल्यानंतर iQube ची किंमत सुमारे १ लाख २३ हजार रुपये होऊ शकते.

हेही वाचा- कार जुनी झाल्यानंतर विकायचा Perfect Time कसा ओळखाल? जाणून घ्या सविस्तरपणे..

FAME II अनुदानात कपात केल्यानंतर, TVS Motor ने सबसिडीचा बोजा इतर कंपन्यांप्रमाणे ग्राहकांच्या खिशावर टाकण्याऐवजी एक प्रभावी पर्याय निवडला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी एक लॉयल्टी प्रोग्राम सादर केला आहे. ज्यामध्ये उत्पादन खर्च ग्राहकांना भरावा लागेल आणि विक्रीवरही कमीत कमी परिणाम होईल. या लॉयल्टी कार्यक्रमांतर्गत कंपनी हळूहळू आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वाढवणार आहे.

TVS लॉयल्टी प्रोग्राम म्हणजे काय?

TVS ने iQube ग्राहकांसाठी विशेष लॉयल्टी लाभ कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम ज्यांनी २० मे २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे iQube बुक केले आहे त्यांच्यासाठी लागू होणार आहे. लॉयल्टी प्रोग्राम केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 17:19 IST
Next Story
Car Sales in May 2023: मे महिन्यात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त गाड्या