देशातील दुचाकी क्षेत्रामध्ये कमी बजेटमध्ये लांब मायलेज असलेल्या स्टायलिश पद्धतीने डिझाइन केलेल्या बाइक्सची विस्तृत श्रेणी आहे, ज्यामध्ये टीवीएस, होंडा, बजाज, हीरो (TVS, Honda, Bajaj, Hero) यांसारख्या कंपन्यांच्या बाइक्सची संख्या सर्वाधिक आहे. जर तुम्हाला तुमची स्वतःची स्टायलिश बाईक घ्यायची असेल जी जास्त मायलेज देखील देते, तर १२५ सीसी सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
टीवीएस रेडर आणि होंडा एसपी १२५ बाइकची किंमत, फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

टीवीएस रेडर (TVS Raider)

कंपनीने नुकताच टीवीएस रेडर लॉंच केली आहे, जी कंपनीने दोन प्रकारांसह लॉंच केली आहे.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Video Make 50 Rice Papad With 1 Cup Cooked Rice Recipe
एक वाटी उरलेल्या भाताचे ५० पळी पापड करून तर पाहा; १५ मिनिटांची रेसिपी आणि चव तर अहाहा, पाहा Video

या बाइकला सिंगल सिलेंडर १२४.८ सीसी इंजिन देण्यात आले आहे जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.हे इंजिन ११.३८ पीयेसची पॉवर आणि ११.२ एन एमचा पीक टॉर्क जनरेट करते, पाच स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

बाईकच्या स्पीडबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक शून्य ते चार सेकंदात शून्य ते ६० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की रेडर ६७ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, टीवीएस रेडरची सुरुवातीची किंमत ७३,४०० रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये ८५,४६९ रुपयांपर्यंत जाते.

( हे ही वाचा: 2021 Audi Q5 Facelift: भारतात लाँच! मर्सिडीज GLC, BMW X3 ला देणार टक्कर )

होंडा एसपी १२५ (Honda SP 125)

ही त्यांच्या कंपनीची एक लोकप्रिय बाईक आहे, जी स्टाईल आणि मायलेजसाठी देखील पसंत केली जाते, ही बाईक कंपनीने दोन व्हेरियंटसह लॉंच केली आहे.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, याला १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे १०.८ पीएस पॉवर आणि १०.९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर होंडाने तिच्या पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात ड्रम ब्रेक दिला आहे.

होंडा एसपी १२५ च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ६५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, या बाईकची सुरुवातीची किंमत ७८,९४७ रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ८३,२४२ रुपयांपर्यंत जाते.