TVS ही एक दुचाकी उत्पादन करणार लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी, बाइकर्ससाठी गोव्यामध्ये TVS MotoSoul बाईक फेस्टिवल शो आयोजित केला होता. या २ दिवसांच्या शो मध्ये कंपनीने आपल्या आधुनिक रेट्रो डिझाईन मोटारसायकल TVS Ronin वर आधारित काही बाईक्स लॉन्च केल्या आहेत. ज्या पूर्णपणे कस्टमाइज्ड आणि दिसायला आकर्षक आहेत. टीव्हीएस कंपनीने देशभरातील लोकप्रिय कस्टम बिल्डर्सच्या सहकार्याने Agonda, Musashi, Wakizashi आणि SCR हे व्हेरिएंट तयार केले आहेत.
कंपनीने TVS Ronin वर आधारित एक फ्लॅट ट्रॅक बाईक देखील लॉन्च केली आहे. टीव्हीएसने motosol २०२३ मध्ये S10X आणि S20X ही हाय टेक बुलूटूथ कम्युनिकेशन डिव्हाईस लॉन्च केली आहेत. जे रायडर्स त्यांचा रायडींग करतानाच अनुभव रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्या हेल्मेटला जोडू शकतात. TVS ने आपल्या प्रीमियम मोटरसायकलसाठी TVS Connect 2.0 अॅप देखील लॉन्च केले आहे.
TVS RONIN Agonda
टीव्हीएसने Ronin Agonda हे मॉडेल जर्मनीमधील लोकप्रिय कस्टम बिल्डर्स JvB Moto च्या मदतीने विकसित केले आहे. या मॉडेलचे नाव हे गोव्यातील समुद्रकिनाऱ्याच्या नावावरून देण्यात आले आहे.
TVS RONIN Musashi
टीव्हीएसने Ronin Musashi हे मॉडेल इंडोनेशियातील कस्टम बिल्डर्स स्मोक्ड गॅरेजच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.
TVS RONIN Wakizashi
टीव्हीएस कंपनीने Ronin Wakizashi हे मॉडेल लॉन्च केले असून त्यांनी हे मॉडेल कस्टम बिल्डर्स राजपुताना कस्टम्सच्या सहकार्याने विकसित केले आहे.
या मॉडेल्समध्ये कंपनीने रोनिन एससीआर स्पोक व्हील बसवले आहेत. याशिवाय यामध्ये Shinko समोर १९ इंचाचे आणि मागच्या बाजूस १७ इंचाचे ब्लॉक पॅटर्न टायर्स दिले आहेत. तसेच पोर्श मॉडेल्सची आठवण म्हणून डेटाइम रायडिंग लाइट्ससह कोलोसियम लेझर-टेक एलईडी हेडलॅम्प देखील कंपनीने या मॉडेल्समध्ये बसवले आहे. यामध्ये दोन्ही बाजूंना सिंगल डेस्क सेटअप देखील देण्यात आला आहे. ronin बाइक्समध्ये गॅलेक्टिक ग्रे हा रंग उपलब्ध आहे. तसेच यामध्ये व्हिझर, फ्रंट फेंडर, इंधन टाकी, रिम्स आणि साइड पॅनल्सवर पिवळे, पांढरे आणि काळे पट्टे देण्यात आले आहेत. तसेच टीव्हीएसने यामध्ये लेदर सीट दिली आहे.