ऑटो कंपनी टीव्हीएस (TVS) ने नुकतीच आपली नवीन बाईक बुधवारी, ६ जुलै रोजी भारतीय बाजारात लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या नवीन बाइकचे नाव रोनिन (TVS Ronin) ठेवले आहे. रोनिन टीव्हीएस ही कंपनीची पहिली निओ-रेट्रो रोडस्टर बाईक आहे, जी भारतीय बाजारात लॉंच झाली आहे. कंपनीने तीन प्रकारांमध्ये ही बाईक भारतात लॉंच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत १ लाख ४९ हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. टीव्हीएसची ही पहिली बाईक आहे, जी २२५.९ सीसी सिंगल इंजिन आणि नवीन स्प्लिट ड्युअल क्रॅडल फ्रेमसह येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाईकचे इंजिन ७,७५० आरपीएमवर २०.१ बीएचपीची कमाल पॉवर आणि ३,७५० आरपीएमवर १९.९३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बाईकचा टॉप स्पीड १२० किमी प्रतितास असेल. याचे इंजिन पाच गिअरबॉक्ससह येईल. कंपनीने अर्बन अ‍ॅडव्हेंचरसाठी रोनिन लाँच केले आहे. या बाईकमध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत, हे आपण जाणून घेऊया.

जगातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात होणार नाही लॉंच; जाणून घ्या यामागची मुख्य कारणे

  • अलॉय व्हील्स

टीव्हीएसची रोनिन बाईक रॉयल एनफील्ड हंटर ३५०, रॉयल एनफिल्ड हिमालयन स्क्रॅम ४११ आणि येझदी स्क्रॅम्बलर सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. टीव्हीएसने ही नवीन बाईक बुलेटेड लूकमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने बाईकमध्ये १७ इंची अलॉय व्हील्स दिले आहेत. याच्या मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनोशॉक रिअर सस्पेंशन देखील मिळते.

  • दोन ड्राइव्ह मोड

ही बाईक फुल-एलईडी लाइटिंग, कलर टीएफटी कन्सोल, राइडिंग मोड्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारख्या वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे. बाईकच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये ड्युअल चॅनल एबीएस फीचर देण्यात आले आहे. बाईकमध्ये रेन आणि अर्बन असे दोन ड्राईव्ह मोड देखील मिळतील.

टीव्हीएस रोनिनला क्रोम केसिंग, फ्लोटिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सिंगल-पीस सीट, ३डी टीव्हीएस लोगो, टू-टोन बॉडी कलर, वर्तुळाकार रीअरव्ह्यू मिरर, टीयर-ड्रॉप आकाराची इंधन टाकी, मॅट ब्लॅक साइड स्लंगसह गोल आकाराचे हेडलाइट क्लस्टर मिळते.

लवकरच कंपनी दुसरी बाईक लॉंच करू शकते

लवकरच टीव्हीएस आपल्या क्रूझर बाईक, झेपेलिनवर अपाचे आरआर ३१० ची नवीन आवृत्ती देखील लॉंच करू शकते. जरी मीडियामध्ये झेपेलिनबद्दल फारशी माहिती नाही, परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी कंपनीने एक क्रूझर संकल्पना बाइक सादर केली होती आणि असे मानले जाते की आता कंपनी स्वतः झेपेलिन म्हणून लॉंच करणार आहे. कंपनीने ऑटो एक्सपो २०१८ मध्ये दाखवलेली झेपेलिन क्रूझर बाईक २२०सीसी इंजिनची होती.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs ronin price features milage details powerful bike enters the arena to beat pulsar pvp
First published on: 07-07-2022 at 11:01 IST