Two-Wheeler Sales November 2023: भारतातील मोठा वर्ग प्रवास करण्यासाठी दुचाकी वाहनांना प्राधान्य देतो. त्यामुळे भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची विक्री होत असते. दुचाकी वाहनांमध्ये जास्त असलेल्या बाईकला मोठी मागणी आहे. परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली या बाईक स्टायलिश लुक आणि आरामदायी राइड सारख्या फीचर्ससह येतात.

दर महिन्याला लाखो मोटारसायकली विकल्या जातात आणि त्यात हिरो स्प्लेंडर अव्वल स्थानावर आहे. हिरो स्प्लेंडर ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या महिन्यातही आता याच बाईकनं बाजी मारली आहे. स्प्लेंडरने सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी एक म्हणून आपला दर्जा कायम ठेवला. परंतु, टॉप-१० सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींच्या यादीत एक नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर १००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Best Selling SUVs
स्वस्त कार सोडून देशातील बाजारात ‘या’ ४-मीटरपेक्षा मोठ्या ५ सीटर SUV ची तुफान विक्री, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा!
sadhav shipping starts ferry service for ongc offshore employees
ओएनजीसीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांसाठी साधव शिपिंगची फेरी बोट सेवा
Metro security guards caught the bicycle thief in Nagpur
नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले
loksatta analysis challenges faced during rescue operation from ghatkopar hoarding collapse site
घाटकोपरमध्ये लढाई अजूनही सुरूच! अजस्र फलक, अरुंद जागा, आगीची भीती, जखमींचा आकांत आणि निघून चाललेली वेळ…
Country largest state bank quarterly profit at Rs 21384 crore
देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेचा तिमाही नफा २१,३८४ कोटींवर; भागधारकांना  प्रति समभाग १३.७० रुपयांचा लाभांश घोषित 
Best Selling SUV Car
मारुती, ह्युंदाईच्या कार नव्हे तर देशातील ‘या’ सर्वात स्वस्त SUV ची तुफान खप, मायलेज २६ किमी, किंमत…
Best cheapest bikes
३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी
pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…

ही मोटरसायकल हिरो पॅशन आहे. जरी हिरो पॅशन विक्रीच्या चार्टमध्ये आठव्या स्थानावर राहिली परंतु विक्री वाढीच्या बाबतीत या बाईकनं सर्वांना आश्चर्यचकित केले. हिरो पॅशनच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. खरं तर, हिरो पॅशनच्या एकूण २ हजार ७४० युनिट्स गेल्या वर्षी (२०२२) नोव्हेंबरमध्ये विकल्या गेल्या होत्या, परंतु या वर्षी (२०२३) नोव्हेंबरमध्ये ३४,७५० युनिट्स विकल्या गेल्या, ज्यामुळे वार्षिक आधारावर विक्री ११६८.२५ टक्क्यांनी वाढली.

(हे ही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ, Yamaha च्या दोन नव्या बाईक देशात दाखल; पाहा किंमत…)

Hero MotoCorp ने पॅशन प्लस भारतीय बाजारपेठेत पुन्हा नव्या अवतारात लाँच केले आहे. नवीन मोटरसायकलच्‍या डिझाइनला नवीन रूप देण्यात आले आहे, तसेच राइडर्ससाठी युटिलिटी व कम्‍फर्ट फॅक्‍टरमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. ही बाईक दोन मॉडेल्समध्ये येते. यात PASSION+ आणि PASSION XTEC चा समावेश आहे. पॅशन प्लसमध्ये ९७.२cc इंजिन आहे आणि Passion XTEC मध्ये ११३.२cc इंजिन आहे.

नवीन हिरो पॅशन+ मध्‍ये जुन्‍या वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. तसेच ही मोटरसायकल समकालीन आहे. सर्वात मोठ्या व व्‍यापक प्रतिष्‍ठेसह पुनरागमन केलेल्‍या पॅशन+ मध्‍ये लुकही नवीन आहे, जो स्‍टायलिश ग्राफिक्‍ससह सुधारण्‍यात आला आहे PASSION+ ची किंमत ७७,९५१ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. तर, PASSION XTEC ची किंमत ८५,४३८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते.