टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक वाहने देशात धुमाकूळ घालत आहेत. उत्तम रेज आणि फीचर्समुळे त्या ग्राहकांना भुरळ घालतात. टाटाने काही महिन्यांपूर्वी टिआगो ईव्ही लाँच केली होती. लाँच इव्हेंटमध्ये निर्मात्यांनी टिगोर ईव्हीला अपडटे करण्याची घोषणा केली होती. ही ईव्ही आता लवकरच अपडेटेड फीचर्स आणि दोन रंग पर्यायांसह ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. टाटाने या अपडटेड टीगोरचा टिझर देखील रिलीज केला आहे.

अद्ययावत फीचरसह नवीन टिगोर ईव्ही लवकरच लाँच होणार आहे. टिगोरला नवीन रंग देण्यात आला आहे. आतापर्यंत ही कार सिग्नेचर टील ब्ल्यू आणि डेटोना ग्रे या दोन रंग पर्यायांसह उपलब्ध होती. आता यात आणखी एका रंगाचा समावेश झाला आहे. टिगोर ईव्ही मॅग्नेटिक रेड रंगासाह उपलब्ध होणार आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

(INNOVA VIDEO: लाँच होण्यापूर्वीच पाहा नवीन इनोव्हा, सनरूफसह दिसते भन्नाट, व्हिडिओतून जाणून घ्या फीचर्स)

फीचरच्याबाबतीत बोलायचे झाल्यास कारमध्ये क्रुज कंट्रोल फीचर मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, हे फीचर नेक्सॉन ईव्ही प्राइममध्येही उपलब्ध नाही. मात्र, टीगोर ईव्हीमध्ये ते मिळणार आहे. कॅबिनला लेदर अपहोलेस्टेरी मिळणार असून याने केबिनला प्रिमियम लूक मिळेल. कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन सेन्सिंग वायपर्सही मिळतील.

सध्या उपलब्ध असणाऱ्या टिगोर ईव्हीची इलेक्ट्रिक मोटर ७४.७ पीएसची कमाल शक्ती आणि १७० एनएमचा टॉर्क निर्माण करण्यासाठी सक्षम आहे. वाहनामध्ये ड्राइव्ह आणि स्पोर्ट असे दोन मोड्स आहेत. वाहनामध्ये २६ केडब्ल्यूएचचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कार ० ते १०० किमी प्रति सेकंदाचा वेग ५.७ सेकंदात गाठू शकते. ही कार १८० ते २०० किमी पर्यंतची रेंज देते.