Tvs raider 125 launch : बजेटमध्ये चांगले मायलेज देणाऱ्या दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये टीव्हीएसनेही आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. १०० सीसी सेगमेंटमध्ये टीव्हीएसच्या दुचाकी होंडा, हिरो बाइक्सना तर आव्हान देतच आहे, त्याचबरोबर आता १२५ सीसी सेगमेंटवर देखील टीव्हीएसचा डोळा आहे. कंपनी आज आपली अपडेटेड १२५ सीसी बाईक टीव्हीएस रायडर १२५ लाँच करणार आहे.

लाँच देखील अनोखा असणार आहे. कंपनी टीव्हीएस मोटोव्हर्स हे मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. यावरच टीव्हीएस रायडर बाईकचे लाँचिंग होणार आहे. ही बाईक २०२१ मध्ये लाँच झालेल्या आय रायडर या बाईकचे अपडेटेड मॉडेल आहे. कंपनीने प्रचारासाठी कुठलीच कसर सोडली नाही. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या बाईकबाबत काही टिझर देखील रिलीज केले होते.

How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
Apple upcoming iPhone 16 with more RAM and storage to enable advanced on device AI features
Apple ची मोठी घोषणा! AI फीचर्ससह iPhone 16 सीरिज करणार लाँच, पाहा डिटेल्स

(कमी वापरण्यात येणारे ‘हे’ फीचर टाळल्यास स्वस्तात मिळू शकते कार, जाणून घ्या)

बाईकमध्ये ही आहेत वैशिष्ट्ये

  • बाईकमध्ये १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन मिळणार आहे. हे इंजिन ११.२ बीएचपीची शक्ती आणि ११.२ एनएमचा टॉर्क निर्माण करते.
  • बाईकमध्ये ३ व्हॉव्ह एअर आणि ऑइल कूल एफ वाय इंजिन असेल.
  • इंजिन ५ स्पिड गेअरबॉक्ससह मिळेल.
  • ० ते ६० किमी प्रति तासाचा वेग ५.९ सेकंदात गाठत असल्याचा दावा केला जात आहे.
  • बाईकच्या पुढील चाकाला २४० एमएमचा डिस्क ब्रेक किंवा १३० एमएमचा ड्रम ब्रेक आहे. तर मागील चाकाला १३० एमएमचा ड्रम ब्रेक आहे.
  • बाईकला १७ इंच अलॉय व्हिल्स असून त्याला ट्युबलेस टायर असणार आहेत.

ही आहे किंमत

टीव्हीएस १२५ रायडरची एक्स शोरूम किंमत ८५ हजार ९७३ ते ९३ हजार ४८९ रुपये इतकी आहे. दरम्यान अपडेटेड मॉडेल हे प्रमिमियम किंमतीमध्ये आज लाँच होण्याची शक्यता आहे. किंमत १ लाखांवर जाऊ शकते.