कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण लगेच “गूगल कर ना” असं सहज म्हणतो. गूगलवर सर्च करण्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, कोणत्याही गोष्टी बाबत शंका असेल किंवा एखादी गोष्ट आठवत नसेल तर लगेच आपण गूगलची मदत घेऊन खात्री करून घेतो. अनेक वेळा आपली मदत करणाऱ्या गूगलचा वापर करून पार्क केलेली कार देखील शोधता येते हे बऱ्याच जणांना माहित नसेल. या फीचरचा वापर करून पार्किंग लॉटमधून कार शोधण्यासाठी मदत होते. काय आहे हे फीचर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पार्किंगमध्ये कार शोधण्यात कधीकधी आपला बराच वेळ वाया जातो, अशावेळी गूगलचे हे फीचर वापरून लगेच कार शोधता येणार आहे. गूगल मॅप्सकडुन हे फीचर लाँच करण्यात आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही पार्किंगची जागा मार्क करू शकता. यामुळे तुम्ही गाडी कुठे मार्क केली होती किंवा आता पार्किंग कुठे करू शकता ती जागा दाखवण्यात येईल. या फिचरमध्ये करंट लोकेशन सेव्ह करण्याचा पर्याय असेल.

आणखी वाचा : २० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पाच आकर्षक कार लवकरच होणार लाँच; पाहा यादी

पार्किंग करताना या स्टेप्स वापरून लोकेशन सेव्ह करा

  • मोबाईलमध्ये पार्किंग लोकेशन सेव्ह करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गूगल मॅपचे अपडेटेड वर्जन असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या मोबाईल मध्ये लोकेशन सर्विस इनेबल केले असल्याची खात्री करा.
  • गूगल असिस्टंटलासुद्धा परवानगी देण्यात आल्याची खात्री करा.
  • गाडी पार केल्यानंतर लोकेशन सेव्ह करा.
  • त्यानंतर पार्किंगमधील गाडी शोधण्यासाठी सेव्ह केलेले लोकेशन उघडा आणि डायरेक्शन पर्यायावर क्लिक करा.
  • यामुळे सहजरित्या पार्किंगची जागा किंवा पार्क केलेली गाडी शोधण्यात मदत होईल.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use this google feature to find your car in parking lot know more pns
First published on: 21-09-2022 at 11:07 IST