‘साराभाई वर्सेस साराभाई’ (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं नुकतच अपघातात निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू या ठिकाणी हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वैभवीचा जागीच मृत्यू झाला.अभिनेत्री तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारमधून प्रवास करत असताना एका निमुळत्या वळणावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन कार दरीत कोसळली. तिच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला बसलेला हा मोठा धक्का आहे. या अभिनेत्री कोणत्या कारनं अपघात झाला, या कारचे फीचर्स काय, ही कार किती सुरक्षित आहे, चला तर जाणून घेऊया…

‘या’ सात सीटर कारने झाला वैभवी उपाध्यायचा अपघात

वृत्तानुसार, अपघातावेळी वैभवी उपाध्याय आणि तिचा होणारा नवरा फॉर्च्यूनर एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते, अशी माहिती आहे. टोयोटाच्या प्रसिद्ध एसयूव्ही फॉर्च्युनरचे ७-सीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळे स्थान आहे. फॉर्च्यूनर एसयूव्ही भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन प्रकारात येते. कंपनीने या एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये २.७ लिटर क्षमतेचं इंजिन दिलंय. हे इंजिन १६६ PS पॉवर आणि २४५ Nm टॉर्क जनरेट करतं. तर, डिझेल व्हेरिअंटमध्ये २.८ लिटर टर्बो डिझेल इंजिन दिलं असून हे इंजिन २०४ PS पॉवर आणि ५०० Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळतो.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल

फॉर्च्यूनर एसयूव्ही फीचर्स

टोयोटाने फॉर्च्यूनरमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेचा सपोर्ट असलेली ८.० इंचाची स्मार्ट प्लेकॉस्ट टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. याशिवाय, सबवूफरसोबत प्रीमियम ११ स्पीकर्स JBL ऑडिओ सिस्टिम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेदर सीट व्हेंटिलेशन आणि इलेक्ट्रॉनिक डेफरेंशियल लूक असे अनेक फीचर्स दिले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट्स, वायरलेस फोन चार्जर, टोयोटा सेफ्टी सेन्स, लेन डिपार्चर वॉर्निंग, रडार-गायडेड डायनॅमिक क्रूज कंट्रोल अशा फीचर्स दिले आहेत.

फॉर्च्यूनर एसयूव्हीची सुरक्षितता

सुरक्षेच्या बाबतीत देखील Toyota Fortuner ही एसयूव्ही टाॅपवर असून यामध्ये कंपनीने ७ एअरबॅग्ससोबत व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) असे अनेक महत्त्वाचे फीचर्स दिले आहेत.

फॉर्च्यूनर एसयूव्ही किंमत

भारतात टोयोटा फॉर्च्यूनर ७ सीटर एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत ३२.५९ लाख रुपये ते ५०.३४ लाख रुपयांपर्यंत आहे.

वैभवीच्या कारच्या अपघात नेमका कशामुळे झाला?

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वैभवी आणि तिचा होणारा नवरा कारमधून प्रवास करत होते. एका वळणावर त्यांनी समोरुन येणाऱ्या ट्रकला जाण्यासाठी रस्ता दिला. वैभवीचा होणारा नवरा जय सुरेश गांधी कार चालवत होता. त्या वळणावर ट्रकने कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यांची कार दरीत कोसळली. अपघात झाला त्यावेळी वैभवीने सीट बेल्ट लावले नसल्याचे समोर आले आहे. सीट बेल्ट न लावलेली वैभवी कारमधून बाहेर फेकल्या गेली व तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि हृदयविकाराचा झटका आला, अन् जागीच तिचा मृत्यू झाला.

सांगण्याचं तात्पर्य एवढचं की, प्रवास करताना नेहमी सीट बेल्टचा वापर करावा.