इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे सध्या दुचाकी क्षेत्रातील इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरची श्रेणी खूप मोठी झाली आहे. सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या रेंजमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्मात्या Velev Motors च्या इलेक्ट्रिक स्कूटर Velev Vio भर पडली आहे. कमी बजेटमध्ये लांब रेंजची स्कूटर आहे. तुम्हालाही कमी बजेटमध्ये लांब पल्ल्याची स्कूटर खरेदी करायची असेल, तर या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असेल.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये ४८ वॅट, २० एएच क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकसोबत कंपनीने २५० वॅटची इलेक्ट्रिक मोटर दिली असून ही मोटर BLDC तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्कूटरच्या बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक २ ते ३ तासांत पूर्ण चार्ज होतो. स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ६० ते ७० किलोमीटरची रेंज देते. २५ किमी प्रतितास इतका सर्वोच्च वेग उपलब्ध आहे.

स्टायलिश स्विच इलेक्ट्रिक बाइकची जोरदार चर्चा, सिंगल चार्जमध्ये १२० किमीची रेंज

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकात आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमवर आधारित आहेत. कंपनीने यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुश बटण स्टार्ट, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यांसारखे फिचर्स दिले आहेत. स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने ५२,००० रुपयांची सुरुवातीची किंमत असलेली स्कूटर लाँच केली आहे.