Limousine Aurus Senat : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत येत असतात. बुधवारी पुतिन उत्तर कोरिया देशाच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पुतिन यांनी रशियामध्ये बनवली जाणारी लिमोझिन Aurus Senat उत्तर कोरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांना भेटस्वरुप दिली आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक या कारच्या फीचर्स आणि किंमतीविषयी चर्चा करताना दिसत आहे. (Vladimir Putin gifts a russian limousine aurus senat car to kim jong)

रशियन स्टेट टिव्हीवर दाखवलेल्या एका व्हिडीओमध्ये पुतिन हे त्यांच्या काळ्या रंगाच्या लिमोझिन Aurus Senat कार चालवताना दिसत आहे आणि किम जोंग त्यांच्या शेजारी बसलेले दिसत आहे. ही रशियन राष्ट्रपतीची अधिकृत कार आहे. पुतिन यांनी किम जोंग यांनी पहिली Aurus Senat फेब्रुवारीमध्ये दिली होती. त्यामुळे किम जोंग यांच्याकडे दोन लिमोझिन Aurus Senat कार असाव्यात, असा अंदाज आहे.

Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत
Dashcam for vehicle
वाहन आणि चालकांच्या सुरक्षेसाठी गाडीत बसवा HD क्वॉलिटीचा डॅशकॅम; काय आहे किंमत, जाणून घ्या…
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”

हेही वाचा : होंडा, बजाज फक्त पाहतच राहिल्या! ७४ हजाराच्या ‘या’ बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, ३० दिवसात ३ लाखांहून अधिक विक्री

लिमोझिन Aurus Senat कारचे फीचर्स

लिमोझिन Aurus Senat कारचे फीचर्स पाहून कोणीही थक्क होईल. ही कार बुलेटप्रूफ असून यामध्ये अविश्वसनीय फीचर्स आहेत. Aurus कार ही तीन व्हर्जनमध्ये विभागली आहे एक म्हणजे Standard Senat, दुसरी म्हणजे Senat Long, आणि तिसरी म्हणजे Senat Limousine. या कारमध्ये ४.४ लीटरचे V8 चे इंजिन लावले आहे जे ८५० बीएचपी पॉवर निर्माण करते.

पुतिन यांच्यासह अनेक मोठे नेते ही कार वापरतात. लिमोझिन Aurus Senat मध्ये Advanced Driver Assistance Systems (ADAS), आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टीम, आपत्कालीन कॉल सपोर्ट, कारच्या मागील बाजूला आठ प्रकारचे लाइट, वायरलेस चार्जर, वायफाय इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा : किंमत ३.९९ लाख, मायलेज २६.६८ किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त छोट्या कार, विक्रीतही टाॅपवर, पाहा यादी

लिमोझिन Aurus Senat कारची किंमत

ही कार २०१८ मध्ये पहिल्यांदा जेव्हा लाँच करण्यात आली होती, तेव्हा या कारची किंमत १.६ लाख डॉलर्स म्हणजेच १.३२ कोटींच्या घरात होती. तर २०२१ मध्ये, या कारच्या किंमतीत वाढ होऊन ३ लाख डॉलर्स म्हणजेच २.४० कोटी करण्यात आली.