Volkswagan Tiguan भारतात ७ डिसेंबरला होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

फॉक्सवॅगन इंडिया ७ डिसेंबरला टिगुआगन गाडी लॉन्च करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

Volkswagen-Taigun-final-look
Volkswagan Tiguan भारतात ७ डिसेंबरला होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स (Photo- Financial Express)

भारतीय कारप्रेमींमध्ये कायमच नव्या गाड्यांबद्दल उत्सुकता असते. बाजारात कोणती नवी गाडी येणार आहे, इथपासून ते काय फिचर्स असतील याबद्दल कुतूहल असते. आता भारतीय बाजारात आणखी एक नवी गाडी येणार आहे. फॉक्सवॅगन इंडिया ७ डिसेंबरला टिगुआगन गाडी लॉन्च करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. फेसलिफ्टेड ५-सीटर एसयूव्ही ब्रँड इंडिया २.० स्ट्रॅटेजीचा भाग आहे.कार ब्रँडने भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलेल्या चार एसयूव्ही पैकी एक आहे. अद्ययावत टिगुआनने २०२० मध्ये जागतिक पदार्पण केलं होतं. आता एसयूव्ही भारतीय शोरूममध्ये येण्यास सज्ज आहे. टिगुआन लॉन्च केल्यावर जीप कंपास, ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन C5 एअरक्रॉस सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. प्री-फेसलिफ्ट टिगुआन प्रमाणे, फोक्सवॅगनचे उद्दिष्ट प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध स्पर्धात्मक किंमत ठेवण्यासाठी भारतात मध्यम आकाराच्या प्रीमियम एसयूव्हीला स्थानिक पातळीवर असेंबल करण्याचे आहे.

फोक्सवॅगन टिगुआन नव्या स्टाईलसह बाजारात आली आहे. यात क्रोम एम्बेलिशमेंटसह रिफाइन फ्रंट ग्रिल, एलईडी मॅट्रिक्स हेडलँप आणि एलईडी डे-टाइम रनिंग लाइटसह अपडेटेड बम्पर हाउसिंग ट्रँगुलर फॉग लँप आहेत. कारचा एकंदर फ्रंट फॅशिया वेगवान आणि अधिक स्टायलिश दिसतो. साइड प्रोफाईलबद्दल बोलायचे झाले तर याला स्पोर्टी आणि स्टायलिश अलॉय व्हील्स मिळतात. तसेच शार्प कॅरेक्टर लाइन्ससह येते. कारच्या मागील प्रोफाइलला स्लिमर एलईडी टेललॅम्प्स आहेत, त्यामुळे आकर्षित वाटते.

फोक्सवॅगन टिगुआनमध्ये फेसलिफ्टमध्ये २.० लिटर, चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. ते १८७ बीएचपी पॉवर आणि ३२० एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. इंजिन स्टँडर्डच्या ७-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल आणि त्याला ४ मोशन ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD)सिस्टम मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Volkswagan new tiguan arriving on 7th december 2021 rmt

ताज्या बातम्या