स्वयंचलित गाड्यांचं उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी फॉक्सवॅगनचा पुढाकार; बॉशसोबत केली हातमिळवणी

फॉक्सवॅगनच्या Cariad आणि ऑटो सप्लायर बॉश यांच्यात सॉफ्टवेअर विकसित करण्याचा करार झाला आहे.

volksvagen
स्वयंचलित गाड्यांचं उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी फॉक्सवॅगनचा पुढाकार; बॉशसोबत केली हातमिळवणी (Photo- Reuters)

स्वयंचलित गाड्यांचं सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी फॉक्सवॅगन कंपनीने बॉशसोबत हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. फॉक्सवॅगनच्या Cariad आणि ऑटो सप्लायर बॉश यांच्यात सॉफ्टवेअर विकसित करण्याचा करार झाला आहे. या करारा अंतर्गत लेव्हल २ स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित केलं जाईल. हे तंत्रज्ञान कंपनी २०२३ आपल्या वाहनांमध्ये स्थापित करेल, असं फोक्सवॅगन कंपनीने सांगितलं आहे.

Cariad चं २०२५ पर्यंत फोक्सवॅगनच्या ६० टक्के गाड्यांमध्ये सॉफ्टवेअर प्रस्थापित करण्याचं लक्ष्य आहे. दोन्ही कंपन्यांचे हजारापेक्षा अधिक कामगार या प्रकल्पावर काम करणार आहेत. प्रकल्पामध्ये रिअल-टाइम ट्रॅफिक डेटा संकलित करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समावेश असेल. जेणेकरुन ते सॉफ्टवेअर गाड्यांमध्ये वापरता येईल. शहरी रस्त्यांवर स्वयंचलित गाड्यांसाठी लेव्हल २ आणि लेव्हल ३ तंत्रज्ञान विकसित करण्याचं ध्येय आहे. त्याचबरोबर लेव्हल ४ चं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वेळ देखील निश्चित केला जाणार आहे. फोक्सवॅगनचे मुख्य वित्तीय अधिकारी अर्नो अँटलिट्झ म्हणाले की, “भागीदारी नवीन पूल सॉफ्टवेअरमध्ये टॅप करण्यास मदत करेल. विकसित सॉफ्टवेअरचे घटक भविष्यात वाहने आणि इतर ऑटोमेकर्सच्या इकोसिस्टमसाठी देखील वापरले जाऊ शकतात.” कॅरिअडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डर्क हिल्गेनबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “स्वयंचलित तंत्रज्ञान हे ऑटोमोबाईल उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही कंपन्यांनी अलीकडेच एक सामंजस्य करार देखील केला आहे.”

मर्सिडीज बेन्झसारख्या ऑटोमेकर्सनी गेल्या वर्षी लेव्हल ३ ऑटोमेटेड ड्रायव्हिंगसाठी मंजूर केलेल्या प्रणालीसह जर्मनीमध्ये नियामक परवानगी मिळवली आहे. टेस्लाच्या लेव्हल २ ऑटोपायलट सिस्टमपेक्षा एक पाऊल पुढे आहे. Intel Corp च्या Mobileye आणि Alphabet Inc. चे Waymo LLC तसेच चीनमधील Baidu Inc. देखील स्वयंचलित गाड्यांच्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Volkswagen and bosch tie up on automated driving software rmt

Next Story
स्वयंचलित गाडीकडून अपघात झाल्यास दोष कुणाचा?, संपूर्ण जगासमोर पेच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी