Volkswagen showcases ID.2all model EV: हैम्बर्ग-जर्मन ऑटो दिग्गज फोक्सवॅगनने भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठी खेळी खेळली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही, टियागो ईव्ही आणि XUV400 ईव्ही सारख्या कारशी स्पर्धा करण्यासाठी फॉक्सवॅगनने आता आपली नवीन ID 2All  इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन केले आहे. कारबद्दल दोन मोठ्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ती इतर सर्व कारपेक्षा एक पाऊल पुढे राहील. एक म्हणजे या कारची रेंज, जी इतर कोणत्याही कारपेक्षा जास्त असेल. तसेच त्याची किंमत, ज्याबद्दल कंपनीने दावा केला आहे की, ही त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल.

कंपनी २०२६ पर्यंत दहा EV लाँच करणार

कंपनीने असेही जाहीर केले की, फोक्सवॅगन २०२६ पर्यंत ११ इलेक्ट्रिक कार लाँच करेल, त्यापैकी एक ही असेल. यासह, कंपनीने यासंदर्भात फक्त काही माहिती शेअर केली आहे.

Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

(हे ही वाचा : Baleno-Punch चा गेम होणार; मारुती आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, किंमत ७ लाखांपेक्षाही कमी )

ID 2All इलेक्ट्रिक कार रेंज

कंपनीचा दावा आहे की, सर्व सिंगल चार्ज करण्यासाठी २८० मैल म्हणजेच जवळपास ४५० किमी रेंज देईल. त्याचवेळी, कंपनीने आणखी एक मोठा दावा केला आहे की या कारची किंमत २५ हजार युरो म्हणजेच सुमारे २२ लाख रुपये असेल आणि ती कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. मात्र, भारतात त्याची किती विक्री होणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनीने २०२५ पर्यंत ही कार युरोपियन बाजारात उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ID 2All इलेक्ट्रिक कार फीचर्स

कंपनीने या कारबाबत इतर कोणतीही माहिती दिलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार यात जागतिक दर्जाचे फीचर्स असतील. कारमध्ये सुधारित आणि मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल. यासोबतच कारमध्ये अॅम्बियंट लाइटिंग, लेदर अपहोल्स्ट्री, व्हॉईस कमांड यासारखे फीचर्स असतील. कारमध्ये लेग स्पेस वाढवण्यासाठी अपफ्रंट सीट्स दिल्या जातील. तसेच, मागील सीटसाठी कूल केलेला ग्लोव्हबॉक्स देखील असेल.

(हे ही वाचा : Top 5 Two Wheeler: देशात नंबर १ बनण्याच्या शर्यतीत ‘या’ बाईकची बाजी, Honda अन् Bajaj ला पछाडलं )

हॅचबॅक सेंगमेंटवर हल्ला

या कारच्या लाँचसह, फॉक्सवॅगन अनेक मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक हॅचबॅकसह एसयूव्ही सेगमेंटवर मोठा हल्ला करेल. मात्र, तरीही कारच्या किमतीबाबत साशंकता आहे. २० लाखांपेक्षा कमी रेंजमध्ये भारतात लाँच केले गेले, तर अनेक वाहनांसाठी ती मोठी स्पर्धा ठरेल. पण फोक्सवॅगन प्रीमियम श्रेणीत ठेवत युरोपियन बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे, जर भारतातही असेच घडले तर त्याची किंमत थोडी जास्त असेल, अशी अपेक्षा आहे.