फॉक्सवॅगनने SUV सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या त्यांच्या मिड साईज SUV Taigun चे भारतात एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Taigun Anniversary Edition लाँच केली आहे.

फॉक्सवॅगनने गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये टाइगुन ही कार भारतीय बाजारात लॉंच केली होती. ही Taigun Anniversary Edition सध्याच्या एडीशनपेक्षा वेगळी बनवून कंपनीने ती एका नवीन कलर थीमसह सादर केली आहे, ज्यामध्ये कंपनीने आधीच अस्तित्वात असलेल्या Curcuma Yellow आणि Wild Cherry Red व्यतिरिक्त Rising Blue कलरची थीम सादर केली आहे.

Viral Video Indian family welcome daughter Foreigner Boyfriend With Traditional Rituals in Heartwarming Video
भारतीय कुटुंबाने लेकीच्या परदेशी प्रियकराचं केलं हटके स्वागत; फुलांचा केला वर्षाव अन्… पाहा हृदयस्पर्शी VIDEO
marathi actors Atul Parchure told a funny story in the drama
दोन झुरळांमुळे नाटकाच्या चालू प्रयोगात उडाली तारांबळ, अतुल परचुरेंनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले…
mrunal dusanis meets tu tithe me fame neha shitole
चार वर्षांनी भारतात परतली मृणाल दुसानिस; ‘तू तिथे मी’ मधील लाडक्या मैत्रिणीची घेतली भेट, फोटो आला समोर
Pakistani and Indian Lesbian couple Sufi Malik And Anjali Chakra separated
“मी तिची फसवणूक केली,” भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडप्याचं पाच वर्षांचं नातं संपलं, काही दिवसांवर होतं अंंजली-सुफीचं लग्न

आणखी वाचा : Honda लवकरच भारतात तीन नवीन बाईक लॉंच करणार, वाचा सविस्तर

Volkswagen Taigun Engine and Transmission
कंपनीने दोन टर्बो इंजिन ऑप्शनसह फोक्सवॅगन टाइुगनची ऑफर दिली आहे. यातील पहिले इंजिन १.० लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे ११५ PS पॉवर आणि १७८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे १.५ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे १५० PS पॉवर आणि २५० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

या दोन्ही इंजिनसह, कंपनीने ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व्यतिरिक्त १ लीटर इंजिनसह ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि १.५ लिटर इंजिनसह ७ स्पीड डीएसजी ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. याशिवाय कंपनीने या दोन्ही इंजिनांसह अॅक्टिव्ह सिलेंडर टेक्नॉलॉजी आणि इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी जोडली आहे.

आणखी वाचा : Tata Motors Car Discount September 2022: हॅचबॅकपासून ते SUV पर्यंत, टाटा मोटर्सच्या या गाड्यांवर ४० हजारांपर्यंत सूट

Volkswagen Taigun Anniversary Edition Mileage
टाइगुनच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही मिड साईजची SUV १९.२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Volkswagen Taigun Anniversary Edition Features
Tigun मध्ये कंपनीने Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह १०.१ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, समोरील हवेशीर जागा, कनेक्टेड कार टेक, सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, आणि 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी फीचर्स दिली आहेत.

आणखी वाचा : HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये १५० किमी रेंजचा दावा, किंमत जाणून घ्या

Volkswagen Taigun Anniversary Edition Safety Features
कंपनीने या एसयूव्हीमध्ये सध्याच्या एसयूव्हीची सिक्यूरिटी फिचर्स दिली आहेत, ज्यामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिव्ह्यू कॅमेरा यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

Volkswagen Taigun Anniversary Edition Price
Tigun च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ११.४० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटसाठी १८.६० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.