scorecardresearch

Volkswagen ची नवी जबरदस्त SUV भारतीय बाजारपेठेत लाँच! टक्सन, एअरक्रॉसला देणार टक्कर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

फोक्सवॅगन (Volkswagen) ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी SUV लाँच केली आहे.

Volkswagen ची नवी जबरदस्त SUV भारतीय बाजारपेठेत लाँच! टक्सन, एअरक्रॉसला देणार टक्कर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Volkswagen Tiguan Exclusive Edition SUV भारतीय बाजारात लाँच. (Photo-volkswagen)

SUV Launch: फोक्सवॅगन (Volkswagen) ने भारतीय बाजारपेठेत आपली ‘Volkswagen Tiguan Exclusive Edition SUV’ लाँच केली आहे. ही नवी SUV देशातील Hyundai Tucson, Citroen C5 Aircross आणि Jeep Compass शी टक्कर देणार आहे. ही नवी SUV जबरदस्त फीचर्सने रंंगलेली आहे. जाणून घेऊया या SUV मध्ये काय असेल खास…

Volkswagen Tiguan Exclusive Edition SUV ‘अशी’ असेल खास

या SUV ला उर्जा देण्यासाठी २.०-लिटर TSI पेट्रोल इंजिन वापरले गेले आहे, जे १८७ bhp पॉवर आणि ३२० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ७-स्पीड DSG ला जोडलेले आहे आणि फोक्सवॅगनची 4Motion ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम मिळते. हे प्युअर व्हाईट आणि ओरिक्स व्हाईट या दोन रंगसंगतींमध्ये ते सादर करण्यात आले आहे.

(आणखी वाचा : Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV कारची मागणी वाढली; ५५ हजार ५०० ऑर्डर्स पेडिंग!)

दरम्यान, नवीन Volkswagen Tiguan Exclusive Edition ला मागील बाजूस लोड सिल संरक्षण, नवीन स्पोर्टी १८-इंच अलॉय व्हील, अॅल्युमिनियम पेडल्स आणि डायनॅमिक हबकॅप्स मिळतात. सुरक्षेच्या आघाडीवर, टिगुआनमध्ये सहा एअरबॅग्ज, ABS, ESC, अँटी-स्लिप रेग्युलेशन, EDL, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल, सक्रिय TPMS, थ्री-पॉइंट सीटसह मागील बाजूस तीन-हेड रेस्ट आहेत.

Volkswagen Tiguan Exclusive Edition SUV किंमत

Volkswagen Tiguan Exclusive Edition ची एक्स-शोरूम किंमत ३३.४९ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:49 IST

संबंधित बातम्या