कार विकत घ्यायची आहे? पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; पाहा दमदार मायलेजसह आकर्षक फीचर्स

भारतातील बहुतेक लोक कमी किमतीच्या कार घेणे पसंत करतात. तसेच, पैशांची बचत होण्याबरोबरच त्यांना कारचे मायलेजही चांगले हवे असते.

कार विकत घ्यायची आहे? पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; पाहा दमदार मायलेजसह आकर्षक फीचर्स
या गाड्या तुमच्‍या बजेटमध्‍येही आहेत आणि त्‍याचसोबत त्या इंधनही कमी पितात. (financial Express)

भारतातील बहुतेक लोक कमी किमतीच्या कार घेणे पसंत करतात. तसेच, पैशांची बचत होण्याबरोबरच त्यांना कारचे मायलेजही चांगले हवे असते. आपल्या देशात ५ ते ६ लाखांपर्यंत किंमत असणारी गाडी घेणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी याच किंमतीच्या श्रेणीतील गाड्या बाजारात आणल्या आहेत. आज आपण या श्रेणीतील दर्जेदार गाड्यांचे तपशील जाणून घेणार आहोत. या गाड्या तुमच्‍या बजेटमध्‍येही आहेत आणि त्‍याचसोबत त्या इंधनही कमी पितात.

  • मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी इंडियाने २०२१ सालासाठी नवीन जनरेशन सेलेरियो लाँच केली आहे ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत ५ लाख २५ हजार रुपये आहे. टॉप मॉडेलसाठी ही किंमत ७ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने कारसोबत प्रथमच नवीन जनरेशन १.० लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन दिले आहे, जे एका लिटरमध्ये २६.६८ किमी मायलेज देते. कंपनीचा दावा आहे की हे इंजिन मागील मॉडेलच्या तुलनेत २३ टक्के जास्त इंधन वाचवते आणि भारतीय पेसेंजर कार बाजारपेठेतील सर्वात जास्त पेट्रोलची बचत करणारी कार असल्याचेही सांगितले जात आहे.

फक्त १० हजार रुपये देऊन घरी घेऊन या Hero Electric Scooter; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागणार

  • टाटा पंच

टाटा पंच कारची एक्स-शोरूम किंमत ५ लाख ९३ हजारांपासून पासून सुरू होते आणि सरासरी ९ लाख ४९ हजारांपर्यंत जाते. पंच २२ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत ९ लाख ४९ हजार आहे. त्याच वेळी, पंचच्या ऑटोमॅटिक व्हर्जनची प्रारंभिक किंमत ७ लाख ३० हजार आहे. ही कंपनीची सब-4 मीटर एसयूव्ही आहे, जी टाटा नेक्सॉनपेक्षा खालच्या श्रेणीतील आहे. ती लहान आकाराच्या एसयूव्हीसह क्रॉस हॅचबॅकशीही स्पर्धा करेल. या कारमध्ये १.२-लिटर रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन दिलेले आहे जे ८४बीएचपी पॉवर आणि ११३एनएम पीक टॉर्क बनवते. या कारला मजबूत इंजिन मिळाल्यानंतरही ती एका लिटर पेट्रोलमध्ये सुमारे १९ किमी मायलेज देते.

  • मारुती सुझुकी अल्टो

मारुती सुझुकी अल्टोची एक्स-शोरूम किंमत ३ लाख ३९ हजारांपासून सुरू होते आणि याच्या टॉप मॉडेलची किंमत सरासरी ५ लाख रुपयांपर्यंत जाते. अल्टो ५ प्रकारात उपलब्ध आहे. या कारमध्ये ७९६ सीसी, ३-सिलेंडर, १२-वाल्व्ह इंजिन आहे जे ४७.३३ बीएचपी पॉवर आणि ६९एनएम पीक टॉर्क बनवते. या कारचे इंजिन पेट्रोलच्या बाबतीत खूपच किफायतशीर आहे आणि एका लिटरमध्ये ते २२.०५ किमी पर्यंत धावू शकते. किंमत आणि मायलेज या दोन्हीच्या जोडीने ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती राहिली आहे.

कारमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढणार; एका एअरबॅगसाठी किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

  • रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट क्विडची किंमत सरासरी एक्स-शोरूम ४ लाख ६४ हजारांपासून सुरू होते आणि ६ लाख ९ हजारांपर्यंत जाते. क्विड कार १० प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. क्विड टॉप मॉडेलच्या पेट्रोल कारची किंमत ६ लाख ९ हजार रुपये आहे. त्याच वेळी, क्विडच्या ऑटोमॅटिक व्हर्जनची प्रारंभिक किंमत ५ लाख ७९ हजार आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार २२.३ किमी चालवता येते. कंपनीने या कारमध्ये ०.८-लिटर आणि १.०-लिटर इंजिन बसवले आहेत. रेनॉल्ट इंडियाने या कारला दमदार फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार व्हॅल्यू फॉर मनी कार बनली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 17 August 2022: इंधनांच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत
फोटो गॅलरी