Joy E-bike Mihos Bookings Open Online: आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची ‘Joy e-Bikes’ या ब्रँड नावाने बाजारात विक्री करणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक WardWizard Innovations & Mobility ने नुकतेच ऑटो एक्स्पोमध्ये आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘MIHOS’ लाँच केली होती. ही स्कूटर बनवण्यासाठी कंपनीने पॉली मटेरियल वापरले आहे. या मटेरियलच्या वापरामुळे स्कूटरला हातोड्याने जरी मार लागला तरी तिच्या बाॅडीला इजा होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. आता कंपनीने या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे अधिकृत बुकिंग जाहीर केले आहे.

‘MIHOS’ इलेक्ट्रिक स्कूटरची आजपासून बुकिंग सुरु

MIHOS या स्कूटरची बुकिंग आज रविवार म्हणजे २२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे करता येईल. विशेष म्हणजे, कंपनीने आपले बुकिंग मोफत सुरू केले आहे, म्हणजेच बुकिंगसाठी कोणतेही पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

(हे ही वाचा : सिंगल चार्जमध्ये ११५ किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ४८ हजारांच्या सबसिडीसह खरेदी करा)

MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज

कंपनीच्या मते, याचा व्हीलबेस १३६०mm आहे. यामध्ये सर्व LED लाइटिंग सेटअप देण्यात आले आहेत. कंपनीने ही स्कूटर मेटॅलिक ब्लू, सॉलिड ब्लॅक ग्लॉसी, सॉलिड यलो ग्लॉसी आणि पर्ल व्हाईट या चार खास रंगांच्या निवडीमध्ये लाँच केली आहे. याशिवाय ड्रायव्हरच्या सुरक्षेचा विचार करून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल वैशिष्ट्यांसह साउंड सिम्युलेटरही देण्यात आला आहे.

MIHOS इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्ये

या स्कूटरला रेट्रो स्टाइलिंग देण्यात आली आहे. तसेच यामध्ये रुंद आणि लांब आसनांचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन, मागे मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेंशनसह टेलिस्कोपिक सस्पेन्शन सेटअप देण्यात आला आहे. MIHOS ची रचना भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार आणि १७५ मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह केली गेली आहे. या स्कूटरमध्ये साइड स्टँड सेन्सर आणि हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देखील आहेत. यासोबतच रिव्हर्स मोड, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

(हे ही वाचा : केवळ ३० हजारात तुमची होऊ शकते ‘ही’ क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स )

एका चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची रेंज

MIHOS स्कूटर एका चार्जवर १०० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच, ही स्कूटर ७ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-४० किमी प्रतितास वेग मिळवू शकते. MIHOS मध्ये 74V40Ah Li-ion आधारित बॅटरी देण्यात आली आहे. पहिल्या पाचशे खरेदीदारांसाठी या स्कूटरची किंमत १.४९ लाख रुपये असेल.