Driving Care: पावसाळ्यातच्या वातावरणात कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना या दिवसांत विशेष घ्यावी लागते. जर तुम्ही दूरचा प्रवास करीत असाल, तर याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आज आम्ही तुम्हाला प्रवासादरम्यान अचानक जास्त पाऊस, वादळ आल्यास काय काळजी घ्यावी. यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. प्रवासादरम्यान वादळ आल्यास काय कराल? (Driving Care) दूरचा प्रवास करताना जवळपास शहर नसलेल्या रस्त्यावर किंवा घाटामध्ये असताना अचानक जोराचा वारा सुरू झाल्यास घाबरून जाऊ नका. अशा वेळी सुरक्षित जागा पाहून गाडी उभी करा आणि खालील टिप्सचा वापर करा. सोबत ठेवा या गोष्टी वादळ किंवा जोराच्या वाऱ्यामुळे तुमच्या प्रवासात व्यत्यय येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दूरच्या प्रवासाला घरातून निघण्यापूर्वी उबदार कपडे, पूर्ण चार्ज केलेला मोबाईल, रेनकोट, पैसे, भरपूर पाणी आणि पुरेसे अन्नपदार्थ तुमच्यासोबत ठेवा. माहिती घ्या या गोष्टींची वादळ असतानादेखील तुम्हाला प्रवास करण्याची इच्छा वा तशीच आवश्यकता असल्यास तुम्ही ज्या ठिकाणी असाल, त्या ठिकाच्या स्थानिक बातम्या ऐका. त्यामुळे प्रवासाच्या मार्गात पुढे जर कदाचित एखादा अपघात झाला असेल किंवा दरड कोसळण्यासारखी दुर्घटना घडली असेल, तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून उपलब्ध पर्यायी मार्गाचा विचार करू शकाल. प्रवासाची योजना करा जास्त पाऊस किंवा वादळ येण्याची शक्यता असल्यास अशा हवामानाच्या कमी संपर्कात असलेला मार्ग आहे का हे घरातून निघण्यापूर्वीच शोधा. तुमच्याकडे पर्याय असल्यास नेहमी थांबण्यासाठी एखादी जागा निवडा आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकल्यास आणि तुमच्या फोनची बॅटरी संपल्यास तुम्ही कुठे, कोणत्या परिस्थितीत आहात हे कुटुंबीयांना कळवा. तुमच्या गाडीमध्ये समस्या उदभवल्यास तुम्ही स्थानिक मोबाइल मेकॅनिकशी संपर्क साधा. गाडी हळू चालवा प्रवास करताना जोरात वारा आल्यास गाळी हळू चालविण्याचा प्रयत्न करा. गाडी हळू चालविल्याने वाऱ्यांचा अंदाज येण्यास मदत होईल आणि त्याचा तुमच्या ड्रायव्हिंगवर होणारा दुष्परिणामही कमी होईल. हेही वाचा: पावसाळ्यात कारच्या काचेवर धुके पसरल्यास काय कराल? ‘या’ टिप्स करतील मदत सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करा तुम्ही तुमची कार सुरक्षित ठिकाणी उभी केल्याची खात्री करा झाडाखाली, इमारतींजवळ, टेलिफोन लाइन्स किंवा वाऱ्यात जिथे काही कोसळण्याचा धोका असणाऱ्या इतर गोष्टींजवळ गाडी उभी करणे टाळा. सुरक्षित अंतर ठेवा तुमच्या आणि आसपासच्या इतर कारमध्ये सुरक्षित अंतर ठेवा. मोठ्या वाहनांच्या जास्त मागे-पुढे गाडी चालवू नका.