Viral Video : वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. विशेषत: चारचाकी गाडी चालवताना तर अति दक्षता घ्यावी लागते. अनेकदा आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा काही तांत्रिक गोष्टीमुळे अपघात घडतात. अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. तुम्ही कधी विचार केला का तुमच्या गाडीचे अचानक ब्रेक फेल झाले तर तुम्ही काय कराल? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. आरटीओ अधिकारी (RTO) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि अशा परिस्थितीत नेमके काय करावे, याविषयी माहिती सांगितली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आरटीओ अधिकारी शिवाजी विभुते सांगतात, “वाहन चालवताना तुमच्या लक्षात आले की तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? नमस्कार मी शिवाजी विभुते सहाय्यक निरीक्षक, आरटीओ ऑफीस, चंद्रपूर. ब्रेक फेल झाल्यानंतर घाबरायचं नाही आणि गाडी बंद करायची नाही. तुमच्या वाहनाचं हजार्ड बटण सुरू करा. नंतर तुमची गाडी सेफ प्लेनमध्ये घ्या. ब्रेक फेल झाल्यानंतर हँडब्रेक हा एकमेव ऑप्शन तुमच्या जवळ असतो. पण हँडब्रेक थेट ऑपरेट करायचा नाही. तुमच्या स्पीड कमी करावा लागेल. वाहनाचा स्पीड कमी करण्यासाठी तुम्ही लोअर गीअरला गाडी शिफ्ट करायची. चौथ्या गीअरवरती असाल तर तिसऱ्या गिअरवर या. तिसऱ्या गिअरवरुन दुसऱ्या गिअरवर आणि दुसऱ्या गिअरवरुन शेवटी पहिल्या गिअरवर या. वाहनाचा स्पीड कमी झाल्यानंतर हँडब्रेक ऑपरेट करायचा आहे पण थेट करू नका. ऑपरेट करताना अप डाऊन अप डाऊन असा करायचा आहे ज्यामुळे गाडी तुमची हळू हळू एका जागेवर थांबून जाईल.

हेही वाचा : पुणेकरांनो सावधान! तुमच्याबरोबर होऊ शकतो Phone Pay स्कॅम, Video एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

rto_shivajivibhute या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हँडब्रेकचा वापर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साहेब तुमच्या मुळे काहीतरी शिकायला मिळालं धन्यवाद साहेब” तर एका युजरने लिहिलेय, ” पहिल्यांदा योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती निवड झाली आहे.. आणि धन्यवाद साहेब…” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ महाराष्ट्र मधला पहिला आरटीओ आहे तो ड्रायव्हर लोकांना फायद्याचे सांगत आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर या आरटीओ अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.