स्वयंचलित गाडीकडून अपघात झाल्यास दोष कुणाचा?, संपूर्ण जगासमोर पेच

ऑटो क्षेत्रात आता इलेक्ट्रिक वाहनांसह स्वयंचलित गाड्यांचा बोलबाला आहे.

Self_Drive_Car
स्वयंचलित गाडीकडून अपघात झाल्यास दोष कुणाचा?, संपूर्ण जगासमोर पेच (Photo- AP/ प्रातिनिधीक फोटो)

ऑटो क्षेत्रात आता इलेक्ट्रिक वाहनांसह स्वयंचलित गाड्यांचा बोलबाला आहे. फ्लाईंग कार निर्मितीसाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षात स्वयंचलित गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. स्वयंचलित गाड्यांमुळे लांबच्या प्रवासासाठी जाण्याचा मार्ग सहज मोकळा होतो. तसेच वेळेची बचतही होते आणि नुसतं गाडीत बसून प्रवासाचा आनंद घेता येतो. मात्र असं असलं स्वयंचलित गाड्यांबाबत अनेक प्रश्न मनात घर करून आहेत. स्वयंचलित गाड्या रस्त्यावर चालवणं वाटतं तितकं सोपं नाही.

स्वयंचलित वाहन म्हणजे काय?
स्वयंचलित वाहनात चालकाची आवश्यकता नसते. एकदा ठराविक ठिकाणाची नोंद केल्यानंतर गाडी त्या ठिकाणी नेव्हिगेशनच्या माध्यमातून पोहोचवते. प्रगत तंत्रज्ञानात कॅमेरा, सेन्सर्स आणि रडारचा समावेश असतो. हे फिचर्स स्वयंचलित गाड्यांमध्ये डोळे, कान आणि मेंदूसारखे काम करतात. त्यामुळे स्वयंचलित गाड्या या जास्त सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. पण हा दावा कितपत खरा असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे.

चालकापेक्षा स्वयंचलित कार व्यवस्थित रस्त्यावर धावते?
गाडीत चालक नसेल तर गाडी व्यवस्थितरित्या रस्त्यावर धावते का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी दावा की, कंपनीने विकसित केलेलं स्वयंचलित तंत्रज्ञात कार चालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक सक्षम आहे. कारण माणसासारख्या चुका तंत्रज्ञान करत नाही. कारण माणसाला थकवा आणि तणाव जाणवतो. त्याचा थेट परिणाम ड्रायव्हिंग होऊ शकतो. अनेकदा अपघाताचं कारणही ठरते. मात्र स्वयंचलित गाड्यांचं तसं नसतं. त्यामुळे स्वयंचलित गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

Hero Xtreme 160R vs Yamaha FZS FI V3: स्टाइल, जास्त मायलेज आणि कमी किंमतीत कोणती स्पोर्ट बाइक वरचढ, जाणून घ्या

स्वयंचलित गाडीचा अपघात झाल्यास कुणाला दोष देणार?
पारंपरिक वाहनांपेक्षा स्वयंचलित वाहनं कितीतरी पटीने सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अपघात झाल्यास कुणाला दोष दिला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तांत्रिक चुकांसाठी गाडीला दोषी धरू शकत नाही. गाडीतील व्यक्ती गाडी चालवत नसते, तर मग दोष कुणाचा? कारण यासाठी व्यक्तीला दोषी धरता येणार नाही. काही देशांनी सार्वजनिक रस्त्यावर स्वयंचलिक गाड्यांसाठी नियमावली तयार केली आहे. स्वयंचलित गाडीत व्यक्तीने स्टेअरिंगवर हात ठेवत नेहमी लक्ष देणे आवश्यक आहे. पण असे घडत नाही कारण लोक झोप घेतात, पुस्तके वाचतात किंवा चित्रपट पाहतात. युकेतील एका सरकारी संस्थेने यासाठी काही सूचना केल्या आहेत. स्वयंचलित गाड्यांसाठी नियम तयार करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. स्वयंचलित गाड्यांसाठी कंपन्याचा सहभाग असावा अशी सूचना देखील केली आहे.

स्वयंचलित गाड्यांचं भविष्य काय आहे?
रस्त्यावर कमी वेगाने स्वयंचलित गाड्या चालवण्यासाठी नियम करणारा ब्रिटेन हा पहिला देश असेल, असं गेल्यावर्षी सरकारने सांगितल होतं. मात्र अद्याप त्याबाबतची अमलबजावणी झालेली दिसत नाही. दुसरीकडे भविष्याचा विचार केला तर स्वयंचलित गाड्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कंपन्यांना अधिक सक्षम तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे. येत्या काही वर्षात रस्त्यावर स्वयंचलित गाड्या धावताना दिसतील यात कोणतीही शंका नाही. यासाठी त्या त्या देशातील सरकारला नियमावली तयार करावी लागेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is responsible for accident in self driving car rmt

Next Story
Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रील पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, जाणून घ्या आजचा दर
फोटो गॅलरी