scorecardresearch

एथर, ओला दोघांनाही पुरून उरणार ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर; कंपनीला आहे ठाम विश्वास

एथर, ओला या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारामध्ये प्रचलित असल्या तरी, आमच्या स्कूटरपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

bajaj electric bike
(सौजन्य -financial express)

Bajaj’s chetak electric scooter: गेल्या काही वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटर्सकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकी विभागातील एकूण शेअर्सपैकी इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ६ टक्के मार्केट शेअर असूनही याचा सेल्स २० टक्के आहे. विक्रीमध्ये होणाऱ्या नफ्यामुळे ईव्ही विभागाकडे कंपन्या जास्त लक्ष देत आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये ‘हिरो इलेक्ट्रिक’, ‘एथर’, ‘ओला’ अशा कंपन्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स प्रचलित आहेत. या स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी आता बजाज त्यांची ‘चेतक इलेक्ट्रिक स्कूटर’ घेऊन येणार आहेत.

चेतक टेक्नोलॉजी लिमिटेडअंतर्गत बजाजने आत्तापर्यंत एकाच मॉडेलची विक्री केली आहे. याची सुरुवात त्यांनी २०२० मध्ये केली होती. एरिक वास यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बजाजच्या ईव्ही विभागातील योजनांबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स तयार करणाऱ्याची सुरुवात ज्या कंपन्यांनी केली, त्या आता डबगाईला आल्या आहेत. काही नवीन स्टार्टअप्स या मार्केटमध्ये टॉपवर आहेत. आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे एकच मॉडेल तयार करत असलो तरी, आम्ही स्कूटर्समध्ये लागणाऱ्या बॅटरीजची निर्मिती करतो. तसेच आम्ही ‘युलु बाईक्स’ या कंपनीला त्यांच्या स्कूटरमधील बॅटरीसाठी एक विशिष्ट भाग पुरवतो. युलु आणि चेतक यांच्यासह आम्ही दोन वेगवेगळ्या भागांवर काम करत होतो. या दोन्ही स्कूटर्सच्या बॅटरीजमध्ये खूप फरत आहे.

ते पुढे म्हणाले, मोटर, बॅटरी, मोटर कंट्रोल यूनिट-व्हेइकल कंट्रोल यूनिट, बीएमएस आणि ऑनबोर्ड चार्जर अशा इलेक्ट्रिक स्कूटरमधील भागांची एकाच जागी निर्मिती करणारी बजाज ही एकमेव कंपनी आहे. सध्या इतर कंपन्या त्याच्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी अन्य कंपन्यांवर अवंलबून असतात. त्यामुळे निर्मितीच्या बाबतीमध्ये आमच्यासमोर कोणी टिकणार नाही. ४०,००० किमी चालवूनही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर इतर स्कूटर्सपेक्षा जास्त चांगली काम करेल. याच उद्देशाने आम्ही या स्कूटरची निर्मिती केली आहे. बॅटरीच्या स्टेट ऑफ हेल्थबद्दल (SOH) बोलायचे झाल्यास चेतकच्या बॅटरीचा एसओएच ५०० बेस पॉईंस इतका असेल. जर प्रतिस्पर्धी कंपनीच्या स्कूटरचे एसओएच ९० टक्के असेल, तर चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे एसओएच ९५ टक्के असेल.

Jammu and Kashmir: हिमवर्षावात अडकलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टरांनी WhatsApp च्या मदतीने केली प्रसूती, जाणून घ्या

पिक पॉवर (Peak power)आणि कन्टीन्यूअस पॉवर (continuous power) यांची तुलना करुन ईव्ही मोटर आणि मोटर कन्ट्रोलरची गुणवत्ता आणि क्षमता यांचे परिक्षण करता येते. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कन्टीन्यूअस पॉवर जास्त महत्त्वपूर्ण असते. बजाजच्या स्कूटरची पिक पॉवर 4.01 kW आणि कन्टीन्यूअस पॉवर 3.8 kW इतकी आहे. सध्या बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये कन्टीन्यूअस पॉवरची ७० टक्के आहे. बजाजद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे चेतकच्या क्षमेतमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

जबरदस्त! आता WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार एडिट, लवकरचं येतय नवं फीचर, जाणून घ्या

एरिक वास यांच्या मते, एखाद्या उपकरणामध्ये उपलब्ध असलेल्या फिचर्ससाठी त्यांना सुरुवातीलाच पैसे भरावे लागणार असतील, तर उत्पादनाबाबत त्यांच्या मनातील उत्सुकता कमी होते. हे पटवून देण्यासाठी त्यांनी एथर कंपनीचे उदाहरण दिले. पुढे म्हणाले, डेटा-फिचर्स वगैरेसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा ते योग्यतेकडे पाहून उत्पादन खरेदी करतात. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये चेतक अग्रेसर आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटर चालवल्यावर लोकांना तगडा माल आहे! हे बोलायला हवं. धातूपासून तयार केल्या जाणारी दुचाकी स्कूटर इतर कंपन्यांनी तयार केलेल्या स्कूटर्सपेक्षा फार वेगळी आहे. याची निर्मिती करण्यासाठी मेटल स्टॅम्पिंग (Metal stamping) या प्रक्रियेची मदत घेतली जाते. यामुळे ही स्कूटर बऱ्याच वर्ष टिकून राहील.

इलेक्ट्रिक स्कूटरसाठी १.५ लाख रुपये ही किंमत जास्त वाटू शकते. पण गुणवत्तेबाबत खात्री असल्यामुळे चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत रास्त असल्याचे एरिक यांनी स्पष्ट केले. राजीव बजाज यांनी सांगितल्याप्रमाणे, बजाज कंपनीद्वारे दरवर्षी चेतक स्कूटरचे नवे मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. एरिक यांनी दिलेल्या माहितीमुळे ईव्ही मार्कटमध्ये एथर, ओला यांना मागे टाकत बजाज भविष्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-02-2023 at 14:16 IST

संबंधित बातम्या