Car Care Simple Tips: पावसाळ्याच्या दिवसात कारकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण- पावसाळ्यातील पाणी कारच्या बाहेरील भागाला कठोर ठरू शकते. या दिवसांत पावसात प्रवास करून झाल्यानंतर कार स्वच्छ धुऊन घ्या. त्यामुळे प्रदूषके आणि चिखलापासून कारची सुटका होईल. तसेच कार पार्किंगमध्ये उभी करा. त्याशिवाय कार पूर्णपणे तपासून, सर्व्हिसिंग करून घ्या. त्यावेळी खराब झालेले टायर, वायपर व लाईट्स बदलून घ्या. कारण- पावसाळ्याच्या दिवसांत सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी हे घटक महत्त्वाचे आहेत. तसेच खालील काही टिप्सचाही वापर करा.

पावसाळ्यात कारची काळजी

कार धुवा

कारच्या बाह्य पृष्ठभागावर नेहमीच घाण, काजळी व प्रदूषके असतात. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक निर्माण होते. त्यामुळे प्रवासातून घरी परतल्यानंतर तुमची कार धुऊन घ्या.

वायपर

पावसाळ्यात दूरचा प्रवास करण्यापूर्वी तुमच्या कारचे वायपर ब्लेड बदला. कारण- ते ठराविक कालावधीत कडक होतात. तसेच दारे आणि खिडक्यांचे अस्तर असलेले रबर बीडिंग तपासा आणि ते तुटलेले किंवा जीर्ण झाले असल्यास बदलून घ्या.

मेण कोट आणि पॉलिश

पावसापूर्वी तुमच्या कारवर मेणाचा थर चढवणे हा कारच्या रंगाचे संरक्षण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. मेणाचा थर पाण्याचे थेंबही दूर करतो.

हेडलॅम्प बदला

पावसाळ्यात दूरचा प्रवास करण्यापूर्वी तुमचे हेडलाइट्स आणि टेल लाइट्स कार्यरत आहेत ना याची खात्री करा. रात्रीच्या वेळी दिव्यांशिवाय वाहन चालवणे धोकादायक आहे. हेडलॅम्प लेन्स कालांतराने निस्तेज होतात आणि कमी प्रकाश देतात.

सीट कार्पेट साफ करा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फॅब्रिक सीट्स आणि कार्पेट्स ओलसर होतात आणि त्यामुळे त्यांना कुबट वास येतो. ही बाब आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे लवकरात लवकर या दोन्ही गोष्टी कोरड्या करा. आतील ओलसर भाग सुकण्यासाठी कारच्या खिडक्या खाली करा आणि आतील भाग सुकविण्यासाठी व्हॅक्युम क्लीनरचाही वापर करा.

एसी साफ करा

पावसाळ्यात कारमधील एसीदेखील साफ करा. एसी कारमधील आर्द्रता कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी एसीची सर्व्हिसिंग करा.

टायर

टायर हा कारचा सर्वांत महत्त्वाचा पैलू आहे. तो रस्ता आणि कार यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. ओल्या रस्त्यांवर जास्तीत जास्त पकड सुनिश्चित करण्यासाठी ट्रेड डेप्थ हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ट्रेड टायर्समधून पाणी बाहेर काढण्यात आणि एक्वाप्लॅनिंगला प्रतिबंध करण्यासही मदत करतात.

हेही वाचा: पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत

ब्रेक

ओल्या रस्त्यांमुळे ब्रेक्सची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ब्रेक योग्य स्थितीत आहेत ना याची खात्री करण्यासाठी त्यांची अधूनमधून वारंवार तपासणी करा.