अनेकांसाठी आपल्या वाहनांचा नोंदणी क्रमांक हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकजण अंकशास्त्रावर आधारित क्रमांकासाठी पैसे मोजतात तर काहीजण विशेष क्रमांकच आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर असावे म्हणून पैसे मोजताना दिसतात. अनेकदा अशा विशेष सिरीजचे क्रमांक स्थानिक परिवहन कार्यालयाकडून लिलावासाठी उपलब्ध करुन दिले जातात. अनेकदा केवळ क्रमांक विकत घेण्यासाठी हजारो रुपयांपासून ते अगदी ३० लाखांपर्यंत खर्च केलेल्यांच्या बातम्या आतापर्यंत वाचनात किंवा ऐकण्यात आल्या असते. मात्र नंबर प्लेट्ससंदर्भातील हे वेड केवळ भारतातच नाहीय तर जगभरामध्ये दिसून येतं. हे वेड इतकं आहे की युनायटेड किंग्डममधील एका व्यक्तीने त्यांच्या गाडीसाठी खास क्रमांकाची नंबर प्लेट मिळावी म्हणून तब्बल १३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. १३२ कोटींचा हा विशेष क्रमांक आहे F1.

नक्की वाचा >> …अन् नितीन गडकरींनाही आवरला नाही ‘टेस्ट ड्राइव्ह’चा मोह; गडकरींना भावलेल्या या दुचाकीची वैशिष्ट्यं, किंमत जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युनायटेड किंग्डममध्ये एफ वन या नंबर प्लेटबद्दल वाहनमालकांना प्रचंड आकर्षण आहे. अनेकदा ही नंबर फ्लेट महागड्या गाड्यांवर दिसून येते. यामध्ये मर्सिडीज-मॅक्लरेन एसएलआर, बुगाटी व्हिरॉन यासारख्या गाड्यांचा समावेश होतो. एफ वन हा क्रमांक फॉर्म्युला वन या कार शर्यतीशी संबंध आहे. कार आणि त्यातही वेगाचं वेड असणाऱ्यांना एफ वनचा वेगळा अर्थ सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात लोकप्रिय वाहन शर्यतींमध्ये एफ वन अव्वल स्थानी आहे. हा क्रमांक सर्वात महाग असण्यामागील कारण म्हणजे युनायटेड किंग्डममधील सर्वात लहान सिरीजमधील आणि विशेष क्रमांकांमध्ये हा क्रमांक सर्वाधिक मागणी असणारा आहे. हा जगातील सर्वात लहान नंबर प्लेट्समध्ये अव्वल स्थानी असल्यानेच त्याची किंमत एवढी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds most expensive car registration number cost rs 132 crore kahn designs afzal khan is owner scsg
First published on: 28-06-2022 at 09:28 IST