Xiaomi Electric Car, Xiaomi Ms11 EV Car Design Leaked: आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे. चिनी दिग्गज स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi Corp सुद्धा EV कार निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. कार उत्पादक Nio आणि Geely सारखे स्मार्टफोन बनवत आहेत, तर दुसरीकडे Xiaomi सारख्या स्मार्टफोन निर्मात्या आता इलेक्ट्रिक कार मार्केटमध्येही उतरणार आहेत. आता शाओमीची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार असून याची फारच उत्सूकता लागली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, Xiaomi ने आता कार मॉडेलचे डिझाईन ड्राफ्ट लीक केल्याबद्दल पुरवठादाराला १ मिलियन युआन (जवळपास रु. १.२१ कोटी) दंड ठोठावला आहे.

इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक

Xiaomi ची आगामी इलेक्ट्रिक कार सेडान MS11 लॉन्च होण्यापूर्वीच, इंटरनेटवर तिचे फोटो लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, ही कार २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सादर केली जाईल, कंपनी प्रथम ही कार चीनी बाजारात लॉन्च करेल, नंतर ती इतर काही देशांमध्ये देखील सादर केली जाऊ शकते.

Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

Xiaomi MS11 इलेक्ट्रिक सेडान कारचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे संगणकाच्या स्क्रीनवरून क्लिक करण्यात आल्याचे समजते. २०१० मध्ये, Xiaomi ने स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवसायात प्रवेश केला, कालांतराने कंपनीने टीव्हीपासून स्मार्ट स्पीकर, रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर, स्वयंपाकघरातील उपकरणे या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. आता कंपनी MS11 हे इलेक्ट्रिक कार बाजारातही पहिले उत्पादन म्हणून सादर करणार आहे.

(हे ही वाचा: प्रतीक्षा संपली! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलीव्हरी सुरु, एका चार्जमध्ये धावेल 315 KM )

Xiaomi ची ही इलेक्ट्रिक कार ब्रँडच्या स्मार्टफोनप्रमाणे प्रगत वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, असा विश्वास आहे. चित्रांवरून पाहता, लिडरसह ग्लॉस रूफ आणि मागील खिडकीवर कॅमेरा असल्याचे म्हटले जाते. याशिवाय पॉप-आउट डोअर हँडल आणि प्युअर ब्लॅक विंडो फ्रेम्स या कारला अधिक स्पोर्टी लुक देतात.

Xiaomi MS11 चा लुक आणि डिझाईन बर्‍याच वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कार प्रमाणे आहे. हे पाहता, ती आपल्याला BYD सील इलेक्ट्रिक कारची आठवण करून देते, याशिवाय, पोर्श टायकनची झलक देखील यामध्ये पाहिली जाऊ शकते. हे उत्पादन तयार मॉडेलसारखे दिसते. याआधी हिवाळ्यातील चाचणीदरम्यान चीनच्या रस्त्यांवरही ही कार दिसली होती. सध्या या कारची यंत्रणा आणि तंत्रज्ञानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.