Yamaha Celebrate Ganesh Chaturthi festive with special offers : ७ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या 'लाडक्या गणरायाचे' आगमन होणार आहे. उत्सवाला उधाण आणणाऱ्या या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. अशा सणांदरम्यान अनेक कंपन्यादेखील त्यांच्या ग्राहकांसाठी ऑफर्स, डिस्काउंट घेऊन येत असतात. तर या गणेशोत्सवात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक कंपनी सज्ज झाली आहे. यामाहा मोटर इंडियाने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. काय आहेत या ऑफर चला जाणून घेऊ… गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी, Yamaha मोटर इंडियाने महाराष्ट्र राज्यातील आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या विशेष ऑफर्स सध्या Yamaha च्या '150cc FZ' मॉडेल रेंज बाईक व '125cc Fi Hybrid' या स्कूटरवर लागू असणार आहेत. तसेच या ऑफर्स फक्त १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू असणार आहेत. हेही वाचा…Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतात लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त… तर आता ऑफर्सवर एक नजर टाकूया… १. जर तुम्ही एफझेड-एस एफआय व्हर्जन 4.0 डीएलएक्स, एफझेड-एस एफआय व्हर्जन 4.0, एफझेड-एस एफआय व्हर्जन 3.0, एफझेड एफआय या स्कूटर खरेदी करण्यास इच्छुक असाल, तर तुम्हाला तीन हजार रुपयांची कॅशबॅक आणि पाच हजार ९९९ रुपयांची लो-डाऊन पेमेंट, अशी ऑफर दिली जाईल. २. तर एफझेड-एक्सवर पाच हजार रुपयांची कॅशबॅक आणि पाच हजार ९९९ रुपयांची लो-डाऊन पेमेंट, अशी दमदार ऑफर असणार आहे. ३. तसेच रफॅशिनो १२५ एफआय हायब्रिड / रेझेडआर १२५ एफआय हायब्रिडवर २,००० रुपयांची कॅशबॅक आणि दोन हजार ९९९ रुपयांची लो-डाऊन पेमेंट, अशी तिसरी ऑफर असणार आहे. यामाहाच्या (Yamaha) पोर्टफोलिओमध्ये असलेली वाहने खालीलप्रमाणे : वायझेडएफआर २३ (३२१ सीसी), एमटी-०३ (३२१सीसी), वायझेडएफ-आर१५एम (१५५सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्ही३ (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्ही३ (१५५ सीसी), एमटी-१५ व्ही२ (१५५ सीसी), एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.० (१४९ सीसी), एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड एफआय (१४९ सीसी), एफझेड-एक्स (१४९ सीसी) आणि स्कूटर्स जसे एरॉक्स १५५ व्हर्जन एस (१५५ सीसी), एरॉक्स १५५ (१५५ सीसी), फॅशिनो एस १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रेझेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रेझेडआर स्ट्रीट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी) आदी वाहने.