scorecardresearch

Yamaha की Jupiter कोणती स्कूटर आहे भारी? येथे जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरचं काही…

भारतात बाईक्सप्रमाणे स्कूटर्सची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होते. आज आम्ही तुम्हाला अशा दोन स्कूटरविषयी माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कोणती स्कूटर तुमच्यासाठी खास असेल, हे निवडण्यास सोपो होईल.

Yamaha की Jupiter कोणती स्कूटर आहे भारी? येथे जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरचं काही…
Yamaha Fascino 125 vs TVS Jupiter 125 कोणती आहे दमदार (फोटो- TVS, YAMAHA)

Yamaha Fascino 125 vs TVS Jupiter 125: टु व्हिलर सेक्टरमध्ये मायलेज देणाऱ्या स्कूटरपासून आकर्षक स्टाईल असलेल्या स्कूटरची संख्या मोठी आहे. या क्षेत्रातील स्कूटर सेगमेंटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात १०० सीसी इंजिन ते १५० सीसी स्पोर्टी स्कूटरसह मायलेज स्कूटर देखील उपलब्ध आहेत. आज आम्ही स्कूटर सेगमेंटच्या १२५ सीसी स्कूटरबद्दल बोलत आहोत. ज्या चांगल्या इंजिनसह मायलेज देतात. यात यामाहा फॅसिनो १२५ आणि टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटरची माहिती देणार आहोत. यातून तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्कूटर निवडू शकाल.

Yamaha Fascino 125:

यामाहा फसीने १२५ ही एक स्टायलिश आणि लांब मायलेज देणारी स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकारांसह ही स्कूटर बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये सिंगल सिलिंडरचे १२५ सीसीचे इंजिन, जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२ पीएसचे पाॅवर आणि १०.३ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते आणि या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे.

(हे ही वाचा : Hyundai ची जबरदस्त फीचर्सने भरलेली नवी कोरी कार ८० हजारात खरेदी करा, महिन्याला भरा ‘इतका’ EMI)

स्कूटरचे ब्रेकिंग सिस्टिमबाबत बोलायचे झाले तर तिचे फ्रंट व्हिलमध्ये ब्रेक आणि रेअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. यामाहा फसिनो १२५ या स्कूटरच्या बेस मॉडेलच्या दोन्ही व्हील्समध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. या स्कूटरच्या टॉप मॉडेल फ्रंट व्हीलमध्ये डिस्क आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक पाहायला मिळतील. यात सीबीएस म्हणजे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे. सस्पेन्शबद्दल बोलायचं झाल्यास या स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आलं आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ६८.७५ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. यामाहा फसीनो १२५ स्कूटरची एक्स शोरुम किंमत ७२, ५०० रुपये असून टॉप व्हेरियंटवर ८१,३३० पर्यंत जाते.

TVS Jupiter 125

टीव्हीएस ज्युपिटर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे ८.१५ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत.

(हे ही वाचा : TaTa Motors च्या ‘या’ दोन लोकप्रिय SUV वर लाखोंची सूट, पाहा टाटाची जबरदस्त ऑफर )

TVS Jupiter 125 अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे, जे सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेत, असा दावा कंपनीने केला. टीव्हीएस ज्युपिटर 125 सीसीच्या फीचर्सच्या यादीमध्ये नवीन एंट्री-इंटेली-गो टेक्नॉलॉजी, अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक, बिग-इन-सेगमेंट बूट, यूएसबी सॉकेट आणि एक्सटर्नल फ्यूल-फिलर लिड सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त ३३ लिटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस (सामान ठेवण्याची जागा) असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटर ६४ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटरची सुरुवातीची किंमत ७५,६२५ रुपये (एक्स-शोरूम) असून टॉप व्हेरिएंटवर ८२,५७५ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या