Yamaha R15M Carbon Fibre launched : सणासुदीच्या काळात दुचाकी व चारचाकीच्या प्रसिद्ध कंपन्यांकडून बाजारात नवनवीन वाहने सादर केली जात असतात. इतकेच नव्हे, तर ते आधीच लाँच करण्यात आलेल्या वाहनांचे अपडेट व्हर्जनसुद्धा आणत असतात. तर, आता यामाहा इंडियाने कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिकसह स्पोर्ट्स बाईक आर १५ (R15M) लाँच केली आहे. ही बाईक कार्बन फायबर पॅटर्न फ्लॅगशिप R1M च्या कार्बन बॉडी वर्कपासून प्रेरित आहे. तसेच यामाहाने यापूर्वी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ मध्ये R15M कार्बन फायबर पॅटर्नची पहिली झलक दाखवली होती.

आर १५ लाँचप्रसंगी, यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष इशिन चिहाना म्हणाले, “आर १५ (R15) २००८ मध्ये लाँच झाल्यापासून नेहमीच आघाडीवर राहिली आहे आणि भारतातील असंख्य ग्राहकांना यामाहासह सुपरस्पोर्ट्स मोटरसायकल चालवण्याचा उत्तम अनुभवदेखील दिला आहे. त्यामुळे रेसिंग करणाऱ्या भारतातील तरुण ग्राहकांना आमच्या आंतरराष्ट्रीय मॉडेल्सबद्दल चांगली माहिती आहे.”

फीचर्स

Yamaha आर १५ एम (R15M) ला नवीन कार्बन फायबर पॅटर्नसह नवीन डिझाईन ट्विक्स मिळतात ज्यामध्ये पुढील काउल, साइड्स फेअरिंग व मागील बाजूच्या पॅनल्सच्या फ्लँक्स आहेत. नव्याने लाँच झालेल्या R15 M कार्बन फायबर एडिशनमध्ये Yamaha चा रोड प्रेझेन्स वाढविण्यासाठी यामाहाने वॉटर-डिपिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे. या नवीन फीचर्सव्यतिरिक्त यामाहा मोटरसायकलला ऑल-ब्लॅक फेंडर, टँकवर नवीन डिकल्स, ब्ल्यू व्हील स्टिकर व साइड फेअरिंग देण्यात आले आहे.

हेही वाचा…लोकप्रिय स्विफ्ट गाडी चालणार आता ‘CNG’वर; सहा एअरबॅग्ज अन् दमदार मायलेजही देणार; वाचा किंमत काय असणार

फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास नवीन Yamaha R15M आता Y-Connect ॲप्लिकेशनसह आले आहे; ज्याद्वारे रायडिंग, म्युझिक व व्हॉल्यूम नियंत्रण या बाबी नियंत्रित केल्या जाऊ शकतात. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याशिवाय ग्राहकांच्या सोईसाठी बाईकमध्ये अपग्रेड स्विच गियर, नवीन LED लायसन्स प्लेट लाइट, डिजिटल टीएफटी स्क्रीन, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारख्या फीचर्स आहेत.

इंजिन

Yamaha R15M मध्ये 18.1 bhp आणि 14.2 Nm टॉर्क असलेले 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे असिस्ट आणि स्लीपर क्लचसह सहा स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

किंमत

आर १५ (R15M) ची किंमत फक्त २.०८ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही नवीन बाईक यामाहाच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याला ब्लू टूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल TFT रायडर्स कन्सोल मिळतो आणि सिल्व्हर कलरमध्ये स्टॅण्ड येतो.