Yamaha Scooters Fascino RayZR 125 offers: यामाहा मोटर इंडियाने भारतातील त्यांच्या दोन अतिशय खास स्कूटरवर जबरदस्त ऑफर जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना कॅशबॅकचा लाभ मिळेल. होय, यामाहाने त्यांच्या दोन हायब्रीड स्कूटर मॉडेल्स Yamaha Fascino 125 Fi Hybrid आणि Yamaha RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर ५००० रुपयापर्यंतची विशेष कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्हीही उत्तम लूक आणि उत्तम फीचर्स असलेली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला यामाहाच्या दोन खास स्कूटरवर उपलब्ध असलेल्या कॅशबॅक ऑफरची माहिती देत ​​आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या राज्यात किती सूट?

यामाहा मोटर इंडियाने फसीनो आणि रे जेडआर स्कूटरवर जाहीर केलेली कॅशबॅक ऑफर महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांसाठी वैध आहे. जर एखाद्याला या दोन्ही यामाहा स्कूटर तामिळनाडूमध्ये घ्यायच्या असतील तर त्याला ५००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. दुसरीकडे, महाराष्ट्रात खरेदी केल्यावर ग्राहकांना रु. २५०० पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.यानंतर, उर्वरित पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये, लोकांना यामाहाच्या या दोन हायब्रिड स्कूटर खरेदीवर २५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

(हे ही वाचा: कारमध्ये CNG किट लावण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं नुकसान!)

स्कूटरच्या किमती काय आहेत?

यामाहा फसीनोला भारतात ५ उत्‍तम व्हेरियंटमध्‍ये सादर केले गेले आहे, ज्यामध्‍ये Fascino 125 Hybrid Drum प्रकाराची किंमत ७४,२७८ रुपये आहे, Fascino 125 Hybrid DLX Drum प्रकारची किंमत ७५,२७८ रुपये आहे, Fascino 125 Hybrid Disc ची किंमत आहे ८२,००० रुपये तर, Fascino 125 Hybrid Disc ची किंमत आहे ८२,२७८ रुपये आहे. हायब्रिड डीएलएक्स डिस्क व्हेरिएंटची किंमत ८२,२७० रुपये आहे आणि फॅसिनो १२५ हायब्रिड एसपीएल डिस्क व्हेरिएंटची किंमत ८३,२७० रुपये आहे. त्याच वेळी, Yamaha RayZR 125 देखील ५ प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यांच्या किंमती ८०,००० ते ८७,००० रुपयांपर्यंत आहेत. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha offers bumper cashback on scooters know more details ttg
First published on: 15-02-2022 at 11:14 IST