Yamaha New Bike Launch: यामाहा मोटर इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात धडाकेबाज पुनरागमन करत जबरदस्त गाड्यांची लाँचिंग केली आहे. एकीकडे क्लासिक स्टाइल असलेली नवीन Yamaha XSR155, तर दुसरीकडे कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर्स AEROX-E आणि EC-06, आणि युवा रायडर्ससाठी खास नवीन FZ-RAVE अशा धमाकेदार मॉडेल्सची घोषणा करत यामाहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारतीय बाजारात यामाहाची ‘नवी सुरुवात’

यामाहासाठी ही लाँचिंग केवळ उत्पादनांची नव्हे, तर भारतासाठीच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितले की, पुढील काही वर्षांत भारत हा यामाहाचा सर्वात मोठा प्रीमियम आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी बाजार ठरणार आहे.

यामाहाच्या चेअरमन इतारू ओटानी यांनी सांगितले, “भारत हा आमच्या ग्लोबल ग्रोथ स्ट्रॅटेजीचा केंद्रबिंदू आहे. XSR ब्रँड, नवीन EV मॉडेल्स आणि FZ-RAVE हे आमच्या भविष्यकालीन दिशेचे प्रतीक आहेत. भारतातील ग्राहक आधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन आणि परफॉर्मन्स यांना प्राधान्य देतात आणि आम्ही त्याच अपेक्षांना पूर्ण करत आहोत.”

Yamaha XSR155 – क्लासिक आणि मॉडर्नचा परिपूर्ण संगम

नवीन XSR155 ही यामाहाची आधुनिक रेट्रो स्पोर्ट बाईक आहे, जी जुन्या क्लासिक स्टाइलला आधुनिक इंजिनिअरिंगशी जोडते. गोल LED हेडलाइट, आकर्षक टिअरड्रॉप टँक आणि रग्गेड डिझाईन या बाईकला एकदम खास लूक देतात.
यात १५५cc लिक्विड-कूल्ड VVA इंजिन असून १३.५ kW पॉवर आणि १४.२ Nm टॉर्क निर्माण करते.
अलॉय व्हील्स, डेल्टाबॉक्स फ्रेम, अपसाईड-डाउन फॉर्क्स, ड्युअल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यामुळे राइडिंगचा अनुभव एकदम प्रीमियम मिळतो.

Yamaha AEROX-E आणि EC-06 – इलेक्ट्रिक दुनियेत यामाहाची दमदार एंट्री

भारताच्या ईव्ही बाजारात यामाहाची ही पहिली पायरी, पण एकदम उच्च दर्जाची! AEROX-E ही परफॉर्मन्स ओरिएंटेड ईव्ही असून यात ९.४ kW मोटर आणि १०६ किमी रेंज आहे. यात दुहेरी बॅटरी, इको-पॉवर मोड्स, रिव्हर्स मोड, Y-Connect अ‍ॅप कनेक्टिव्हिटी आणि TFT स्क्रीनसारख्या फीचर्स दिल्या आहेत.

तर EC-06 मॉडेल स्टायलिश, कॉम्पॅक्ट आणि शहरात रोजच्या वापरासाठी खास डिझाईन केलेले आहे.
४.५ kW मोटरसह १६० किमीची सर्टिफाइड रेंज, एलईडी लाईट्स, LCD डिस्प्ले, स्मार्ट टेलेमॅटिक्स, आणि २४.५ लिटर स्टोरेज, यामुळे ही स्कूटर शहरातील कम्युटर्ससाठी एकदम योग्य पर्याय ठरतो.

FZ-RAVE – तरुणाईसाठी खास स्ट्रीटफायटर बाईक

भारतातील प्रसिद्ध FZ सीरिजचा नवा अवतार म्हणजे FZ-RAVE. तरुण रायडर्सच्या पसंतीस उतरावं अशा डिझाईनसह ही बाईक तयार करण्यात आली आहे. १५०cc इंजिन, LED प्रोजेक्टर हेडलाइट, सिंगल सीट, अ‍ॅग्रेसिव्ह बॉडी लूक आणि ABS ब्रेक्स यामुळे ही बाईक स्टायलिश आणि सेफ दोन्ही आहे. FZ मालिकेतील २.७५ दशलक्ष बाईक्सच्या यशानंतर यामाहा पुन्हा एकदा युवा रायडर्सना आकर्षित करणार आहे.

किंमत ऐकून व्हाल थक्क!

Yamaha XSR155: ₹१,४९,९९०

Yamaha FZ-RAVE: ₹१,१७,२१८
(दोन्ही किमती एक्स-शोरूम दिल्ली)

यामाहाने भारतात एकाच दिवशी क्लासिक, ईव्ही आणि स्पोर्टी बाईक अशा तीन वेगळ्या सेगमेंटमध्ये एंट्री देत बाजारात प्रचंड चर्चेला उधाण आणलं आहे. आता पाहावं लागेल की या तीन जबरदस्त मॉडेल्समुळे भारतीय रस्त्यांवर यामाहाची “नवी लाट” कशी उमटते.