List Of Best Scooters : 2022 वर्षात अनेक इलेक्ट्रिक आणि पेट्रोल स्कुटर्स लाँच झालीत. पारंपरिक वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने जबरदस्त रेंज देत असल्याने या वाहनांना लोकांनी भरपूर पसंती दिली. स्कुटर विक्रीच्या बाबतीत ओला या वर्षी आघाडीवर होती. या वर्षी कोणत्या स्कुटर्सनी ग्राहकांच्या मनावर राज्य केले? जाणून घेऊया.
१) बीएमडब्ल्यू सी ४०० जीटी
बीएमडब्ल्यू मोटोरॅडने २०२१ वर्षाच्या शेवटी भारतात BMW C 400 GT मॅक्सी सुक्टर लाँच केला होता. या स्कुटरची किंमत ९.९५ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. स्कुटर ३५० सीसी वॉटर कुल सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक इंजन सह येतो, जो ३५ एचपीचा पीक आऊटपूट देतो. स्कुटर ९.५ सेकंदात ० ते १०० किंमी वेग गाठतो आणि १३९ प्रति तासापेक्षा अधिकची टॉप स्पीड देतो.
(Maruti Car: फक्त ६० हजारात खरेदी करा मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार)
२) अथर ४५० एक्स जेन ३
Ather 450X Gen 3 स्कुटरमध्ये ७४ एएच क्षमतेचे ३.७ किलोवॉट बॅटरी पॅक देण्यात आले आहे. सिंगल चार्जवर स्कुटर १४६ किमी चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्कुटरमध्ये वार्प, स्पोर्ट, राईड, स्मार्ट इको आणि इको मोडचा समावेश आहे. स्कुटरची टॉप स्पीड ८० किमी प्रति तास आहे. स्कुटर होम सॉकेटद्वारे ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी ४ तास ३० मिनिटांचा वेळे घेतो.
३) ओला एस १ प्रो
ओला इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये ३.९७ केडब्ल्यूएचचे बॅटरी पॅक आणि नॉर्मल, स्पोर्ट आणि हाइपर असे तीन मोड मिळतात. स्कुटर सिंगल चार्जवर १८१ किमीची रेंज देत असल्याचा म्हटले जाते. होम सॉकेटवर फुल चार्ज होण्यासाठी ६ तास ३० मिनिटांचा वेळ लागतो. स्कुटर एस १ आणि एस १ प्रो या दोन व्हेरिएंटमध्ये येतो ज्यांची किंमत अनुक्रमे ८५ हजार ९९ रुपये आणि १ लाख २० हजार १४९ रुपये आहे.
(Maruti Car: फक्त ६० हजारात खरेदी करा मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार)
४) व्हिडा व्ही १ प्रो
हिरोने या वर्षी आपले इलेक्ट्रिक ब्रांड व्हिडा सादर केले. या ब्रांड अंतर्गत कंपनीने Vida V1 हा स्कुटर लाँच केला आहे. स्कुटर व्ही १ प्लस आणि व्ही १ प्रो या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. व्ही १ प्लस स्कुटरची किंमत १.४५ लाख रुपये आणि व्ही १ प्रोची किंमत १.५९ लाख रुपये आहे. स्कुटरमध्ये ३.९४ केडब्ल्यूएच पोर्टेबल बॅटरी मिळते जी ८० किमी प्रति तासांची टॉप स्पीड देते.