भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी झपाट्याने वाढत आहे, ज्याच्या पार्श्‍वभूमीवर दुचाकी उत्पादकांनी कमी बजेटमध्ये लॉन्ग रेंज फीचर्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

ज्यामध्ये आम्ही इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर YoBykes ची इलेक्ट्रिक स्कूटर Yo Drift बद्दल बोलत आहोत, जी कमी किमतीत चांगली रेंज स्कूटर आहे.

Maruti Suzuki Grand Vitara Waiting Period
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला…
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Volkswagen India has launched the Taigun GT Line and Taigun GT Plus Sport konw features and prices
कुटुंबाला साजेशी SUV पण लूक एकदम Sporty! Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची किंमत व फीचर्स एकदा पाहाच
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी

जर तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर या स्कूटरच्या किंमतीपासून ते बॅटरी पॅक आणि रेंजपर्यंतच्या फीचर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

यो ड्रिफ्ट इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये 60V, 20Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. हा बॅटरी पॅक 250W पॉवर मोटरने सुसज्ज आहे जो BLDC तंत्रज्ञानावर आधारित आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी ३ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होते.

स्कूटरच्या रेंजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ६० किलोमीटरची रेंज देते. या रेंजसह २५ किमी प्रतितासचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Hyundai Aura Finance Plan: तुम्हाला ही सेडान सुलभ डाउन पेमेंटवर खरेदी करायचीय ?, तर इथे जाणून घ्या फायनान्स प्लान

स्कूटरच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म, थ्री राइडिंग मोड, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलइडी हे फिचर्स जोडले आहेत. टर्न सिग्नल लॅम्प, डीआरएल, कमी बॅटरी इंडिकेटर सारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

स्कूटरच्या डायमेन्शनबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने ती ७०० मिमी रुंद, १८१० मिमी लांब, ११२५ मिमी उंच केली आहे, ज्यासोबत या स्कूटरचे कर्ब वेट ९५ किलो देण्यात आले आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ही यो ड्रिफ्ट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे ज्याची सुरुवातीची किंमत ५१,००० रुपये आहे आणि ही सुरूवातीची किंमत देखील या स्कूटरची ऑन-रोड किंमत आहे.