मलाही खूप सारे छंद आहेत. पण फावल्या वेळेत मला ऊर्जा देणारा माझा छंद म्हणजे चित्रकला. मला चित्रकलेची विशेष आवड आहे. मी तीन वर्षांचा होतो तेव्हापासून मी चित्रे काढायला सुरुवात केली. सुरुवातीला माझे आई-बाबा मला चित्र काढून द्यायचे व ते जसेच्या तसे काढण्याचा मी प्रयत्न करायचो. नंतर पुढे मी तिसरीत गेल्यावर आमचे सर ज्ञानेश काकडे यांच्याकडे चित्रकला शिकण्यास जायला लागलो. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत चांगली श्रेणी मिळाली.

उत्तम चित्रकार होण्यासाठी खूप प्रवास करायचा आहे. मी माझे प्रयत्न चालूच ठेवेन. मला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या कॉलेजमध्ये जायचे आहे. माझे स्वप्न आहे की मी एक मोठा चित्रकार व्हावं आणि माझ्या घरच्यांचं आणि माझ्या सरांचं नाव मोठं करावं.

– आदर्श औदुंबर बोबडे

 ७ वी, सेंट झेवियर्स हायस्कूल, नेरुळ

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मजेशीर भांडण

मुंग्या होत्या

पोहत पाण्यात

गप्पा मारीत

दंग गाण्यात

गाणे त्यांचे

खूपच गोड

गप्पांना त्यांच्या

नाही तोड

तेवढय़ात पाण्यात

आला हत्ती

पोहण्यात म्हणतो

मज्जा कित्ती

मुंग्यांकडे मग

पाहून हसला

सोंडेने पाणी

उडवीत बसला

मुंग्या चिडून

आल्या काठावर

एक बसली

त्याच्या पाठीवर

बाकीच्या मुंग्या

म्हणाल्या तिला

हसतोय कसा बघ

बुडव त्याला.                                                 – एकनाथ आव्हाड