मागच्या भागात आपण कम्प्युटरवरच्या क्रिकेटच्या गेमचं उदाहरण घेतलं होतं. CurrentInnings, OversBowled, TotalRuns, WicketsFallen, We व्हेरिएबल्स अनुक्रमे 1, 0, 0, 0, या किमतींनी सुरुवात केली होती. पण जसा हा गेम पुढे सरकेल तशा आपल्याला या व्हेरिएबल्सच्या किमती बदलायला लागतील. त्यासाठी आपल्या प्रोग्रामला आकडेमोड करायला लागेल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणिती क्रिया तुम्हाला तर माहीतच आहेत. त्या आपल्या प्रोग्रामकडून कशा करून घ्यायच्या ते आज बघू या.

बेरीज व वजाबाकीसाठी आपली नेहेमीचीच ‘‘+’’ आणि ‘‘-’’ ही चिन्हं वापरली जातात. इंग्रजी ‘‘x’’ अक्षराबरोबर गोंधळ होऊ  नये म्हणून गुणाकारासाठी ‘‘*’’ हे चिन्ह वापरलं जातं. भागाकारासाठी, भाज्याच्या खाली रेघ मारून खालच्या ओळीवर भाजक कसा लिहिता येणार, म्हणून भाज्याच्या पुढे तिरपी रेघ (‘‘/’’) देऊन त्याच ओळीवर भाजक लिहिला जातो. घातांक लिहिताना, मुख्य आकडय़ाच्या जरा वरती नि छोटय़ा अक्षरात लिहिण्याऐवजी, ‘‘^’’ हे चिन्हं वापरलं जातं. या चिन्हाला कॅरेट (caret) म्हणतात. (हे चिन्ह तुम्हाला कम्प्युटरच्या कीबोर्डवर 6 या आकडय़ाच्या वरती सापडेल.)

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा

ही सगळी आकडेमोड होते ‘‘=’’ च्या उजवीकडे. आकडेमोड करून आलेलं उत्तर ज्या व्हेरिएबलमध्ये साठवून ठेवायचं, ते व्हेरिएबल ‘‘=’’ च्या अलीकडे लिहिलं जातं.

bal03

एका पदावलीत बरीच चिन्हं असतील तर त्यातलं आधी काय सोडवायचं नि नंतर काय, याचे गणितातले नियम तर तुम्हाला माहीतच असतील (BODMAS Rule). प्रोग्रामिंग लॅंग्वेजेससुद्धा हाच अनुक्रम (हायरारकी /hierarchy) वापरतात. Brackets : कंस, Orders : घात, Division/Multiplication : भागाकार, गुणाकार, Addition/Subtraction: बेरीज, वजाबाकी. एकाच पदावलीत भागाकार, गुणाकार दोन्ही असतील, किंवा बेरीज, वजाबाकी दोन्ही असतील, तर ते डावीकडून उजवीकडे या क्रमाने सोडवले जातात.

गणितात आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंस वापरतो. गोल कंस ऊर्फ पॅरेनथेसिस (parenthese), चौकोनी कंस ऊर्फ ब्रॅकेट्स (brackets) नि महिरपी कंस ऊर्फ ब्रेसेस् (braces). प्रोग्रामिंगमध्येसुद्धा हे तीनही कंस वापरले जातात. पण गणिती चिन्हांचा अनुक्रम ठरवायला मात्र फक्त गोल कंस वापरतात. चौकोनी अथवा महिरपी कंस कधी कसे वापरायचे ते त्यांचा संदर्भ येईल तेव्हा सांगेनच.

आकडे नि गणिती चिन्हं जरी तीच असली तरी कंसाच्या वापरामुळे पदावलीचं उत्तर कसं बदललं ते आलं ना तुमच्या लक्षात?

sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)