मागील भागात आपण पेस्टलबद्दलची माहिती आणि रंगवण्याचे वेगवेगळे तंत्र पाहिले. त्यातीलच हे एक टेक्श्चर मिळविण्याचे तंत्र. प्रथम काढलेल्या चित्राला स्केचपेनने आऊटलाइन काढावी. त्यात वेगवेगळे रंग व त्याच्या छटा योग्य भागांत भरून घ्याव्यात. मग कंपास किंवा नेलकटरमधील डर्ट रिमूव्हरच्या टोकाने रेषा काढून टेक्श्चर मिळेल व कागदाचा भाग दिसू लागेल. यामुळे चित्र उठावदार आणि छान दिसेल. मग बालमित्रांनो, अशी छान छान चित्रं नक्की काढा!
जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com