साहित्य – आगपेटीची डबी, कार्डपेपर, कात्री, गम, पेन्सिल, स्केल, पेन्सिल रंग, काळा पेन, इ.
कृती – आगपेटीच्या डबीच्या बाहेरील आकारात कार्डपेपरवर आकृती काढून घ्या. दोन्ही बाजूंनी सारख्या आकाराच्या दुमडी करण्यासाठी साधारण दोन्ही बाजूस दोन दोन समान आकार दुमडण्यासारखे आयताकृती कागद मोजून कापा. डबीला आतून व बाहेरून कार्डपेपर गुंडाळून चिकटवा व बाहेरील बाजूस डावी- उजवीकडे दोन झिगझॅग फोल्डस् पाडून थोडेसे जास्त दुमडण्यास वाव मिळेल असे दुमडा. आता गोष्ट चित्र रूपात वरून खालील फोल्डवर झिगझॅग उघडीमध्ये पेन्सिलने काढा व पेन्सिल रंगात हलक्या हाताने रंगवा. अशी चित्रपेटी (गोष्ट डबी) तुम्ही शाळेत प्रकल्पासाठी बनवू शकता. करून तर बघा, गंमत वाटेल!
अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com