साहित्य : अ‍ॅक्रॅलिक किंवा पोस्टर्स कलर्स, बारीक ब्रश, हॅंडमेड पेपर.
कृती : आपल्या आवडीचा हॅंडमेड पेपर घ्या. त्यातील रंगसंगतीप्रमाणे रंगांची निवड करा. चित्र टिकाऊ करावयाचे असल्यास  अ‍ॅक्रॅलिक रंग वापरा अथवा पोस्टर कलर वापरले तरी चालतील. साधारण कागदाच्या मध्यावर पेन्सिलने (गाइडलाइनसाठी) रेखांकन करा किंवा बिंदू मापून घ्या. आपले दोन अंगठे रंगात बुडवून त्या मध्य बिंदूच्या दोन्ही (उजव्या- डाव्या) बाजूस ठसा मारा. ठशांच्या मध्यावर गंधाकार व डोक्यावरील मुकूटाची रेषा, खालील बाजूस बारीक ब्रशने सोंड काढा. असे साधे-सोपे एकदंत शुभेच्छाकार्ड भेट देण्यास उपयोगी ठरेल.