साहित्य : माचिसचा रिकामा खोका, एक आयताकृती खोका, रंगीत कार्डपेपर, रंग, ब्रश, काळं पेन, चार रंगांच्या बाटल्यांची बुचे, कात्री, गम इ.
कृती : माचिसच्या आतील बाजूच्या रिकाम्या खणात बाहेरील बाजूचा पोकळ ठोकळा अडकवून घ्या. चारही बाजूंनी रंगीत कागद गुंडाळून नीट चिकटवा. उभट आयताकृती खोक्याला विरुद्ध रंगाच्या कागदात गुंडाळून नीट चिकटवा. माचिसच्या खोक्याची एक बाजू ट्रकची बोनेटची बाजू म्हणून वापरावयाची आहे, तर काळ्या रंगाच्या पेनाने समोरील २ खिडक्या, चालक, दिवे इत्यादी रेखाटून घ्या. बाजूच्या रुंदीत खिडकी व दरवाजाचेही चित्र काढा. वरील ट्रकची बाजू लांबट खोक्याला छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एकमेकांना चिकटवा. आता ट्रकच्या बाजूच्या रुंदीवर ट्रेलरप्रमाणे रंग द्या. चार बुचांना चाकांच्या जागी चिकटवा. आपला टाकाऊपासून टिकाऊ  ट्रक/ ट्रेलर तयार.. पॉम.. पॉम..