साहित्य : मोठे रिकामे रिळ, रद्दी पेपर, एकाच आकाराचे आइस्क्रीमचे गुलाबी चमचे, सेलोटेप, खराब झालेले रेशमी धागे, पांढरा कागद, काळा स्केचपेन, कात्री, गम, लोकर, लेस इ.
कृती : सर्व चमचे उलटे करून एका सरळ आडव्या रेषेत जाड सेलोटेपवर चिकटवा. अर्धवट भागात चिकट बाजू रिकामी राहील असे सांभाळून सावकाशपणे हे काम करा. ही सेलोटेप उभ्या रिकाम्या रिळावर अलगद गुंडाळून हळुवारपणे चिकटवा. घेर पूर्ण चमच्यांनी भरून झग्यासारखा दिसेल. वरील सेलोटेपवर लोकर वपर्यंत गुंडाळा व गमच्या साहाय्याने चिकटवनू घ्या. त्यावर लेसचा तुकडा चिकटवा. रद्दी कागदाची उभी गुंडाळी करा व आडव्या चपटय़ा आकारात गोलाकार गुंडाळा. त्यावर एका बाजूने पांढरा कागद चिकटवा व चेहरा दिसेल असा स्केचपेनने नाक, डोळे काढून सजवा. या चेहऱ्याला खराब झालेले, गुंतलेले रेशमी धाग्याचे बुचके केसांच्या आकारात चिकटवून चेहरा पूर्ण करा. दोन चमचे विरुद्ध बाजूंनी रिळाच्या वर व डोक्याच्या खाली अडकवून घट्ट चिकटवा व उन्हात पूर्णपणे वाळू द्या. ही बहुउपयोगी चमची ताईच्या बांगडय़ा, बॅण्डस्, पिना तसेच दादाचे कडे, अंगठी इ. ठेवण्यास हाताशी आयती मिळेल.