साहित्य : रंगीत कागद, पंच मशीन (फुलांचे), कात्री, गम, जुने ग्रीटिंग कार्ड, सॅटिन रिबीन, स्केचपेन, पेन्सिल, पट्टी, रबर, इ.
bal01कृती : आपल्याला हवा त्या आकाराचा चौकोन ग्रीटिंग कार्डच्या मध्यावर काढा. या चौकोनाच्या चारही बाजू हव्या त्या उंचीत वाढवा. आकृतीत दाखविल्याप्रामाणे मधील बाजूस कोनांमध्ये बदामाच्या आकारात कापा. वेगवेगळ्या रंगीत कागदांनी व पंचने सुशोभित करा. चौकोनाच्या बाहेरील अर्धगोलाकारात फुलांच्या पंचने छिद्र पाडा. दोन सॅटिन पट्टय़ांच्या तुकडय़ांना दोन विरुद्ध बाजूंनी खेचून मध्यावर सर्व टोके एकत्र जोडून गाठ बांधा. आपला गाठीभेटी भेटकार्डवजा डबा तय्यार! हा डबा सुका खाऊ देण्यासही उपयुक्त आहे. तसेच कागदी ट्रे म्हणूनदेखील याचा वापर करता येईल.bal05