News Flash

माय स्पेस : लज्जतदार कोराकाना मंचुरीयन

२६ जानेवारी रोजी आमच्या सोसायटीत विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडण्याविषयीची नोटीस वाचली.

(संग्रहित छायाचित्र)

विभव मंदार टिळक

२६ जानेवारी रोजी आमच्या सोसायटीत विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडण्याविषयीची नोटीस वाचली. माझ्या  मित्रांपेक्षा काहीतरी हटके करण्याचा माझा स्वभाव आहे. जिन्यावर चढताना दोन-तीन पायऱ्या एकदम चढण्यात किती गंमत आहे ना!

मला वेगवेगळे खाद्यपदार्थ करायची आवड आहे. आणि वेळोवेळी मी ही हौस पूर्ण करत असतो. अभ्यासाच्या निमित्ताने मी ‘नाचणी’ विषयी खूप काही वाचलं होतं. ‘नाचणी’ हा शब्दच मला कुतूहलजनक वाटला. मग भारतीय नाचणी आणि मंचुरीयन हा चिनी ड्रॅगन आपल्या डिशमध्ये आला तर कित्ती मजा येईल! असा विचार करत असतानाच मला ‘कोराकाना मंचुरीयन’ हा पदार्थ सुचला. मग आमच्या जनरेशनला आवडेल अशा चमचमीत मंचुरीयनला नाचणीनं मी सजवायचं ठरवलं. नेहमीच्या मंचुरीयनमध्ये आरोग्यास हानी पोहोचवणारे काही घटक असल्यामुळे घरातीलच घटक वापरून आईच्या मदतीने मी नाचणीचं मंचुरीयन केलं आणि त्याला हटके नाव दिलं- कोराकाना मंचुरीयन. सर्वाना हे पोषक मंचुरीयन खूपच आवडलं. तासाभरात २५०-३०० मंचुरीयन फस्त झालं. कसं करायचं हे कोराकाना मंचुरीयन? तर-

कोराकाना मंचुरीयन

साहित्य : २ वाटय़ा भरून चिरलेला गाजर, कोबी, फ्लॉवर, कांद्याची पात, टोमॅटो, उकडलेले बटाटे, कांदा. आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट प्रत्येकी १ टीस्पून, १ वाटी नाचणी पीठ, १/४ वाटी बेसन, चवीप्रमाणे मीठ, मंचुरीयन सॉस, कोथिंबीर, तळणीसाठी तेल.

कृती : सर्व भाज्या, आलं, लसूण, मिरची, नाचणी पीठ, बेसन, मीठ एकत्र करून (आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून) त्याचे लहान लहान गोळे तळून घ्यावेत. ते मंचुरीयन सॉसमध्ये घोळवून त्यावर चिरलेली कोथिंबीर, सॅलड घालावे.

मंचुरीयन सॉस :

साहित्य : १/२ वाटी पाण्यात १ टेबलस्पून नाचणी पीठ कालवून, १ वाटी पाणी, १ टेबलस्पून कांद्याची बारीक चिरलेली पात, आलं-लसूण-मिरची पेस्ट प्रत्येकी १/४ टीस्पून, २ टेबलस्पून टोमॅटो सॉस, ३ टेबलस्पून भाज्यांचा स्टॉक, १ टीस्पून तेल, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर.

कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी, तेल, भाज्या, टोमॅटो सॉस, मीठ, साखर, कांद्याची पात, आलं, लसूण, मिरची, एकत्र करून गॅसवर ठेवावे. उकळी आल्यावर त्यात कालवलेले नाचणी पीठ घालावे. मिश्रण सतत ढवळत राहावे. दाट झाल्यावर गॅस बंद करावा. मी कृती तर सांगितली आहेच. तुम्हीही करून पाहा हा हटके प्रकार. तुम्हालाही नक्की आवडेल.

balmaifal.lok@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:07 am

Web Title: article about korakana manchurian recipe
Next Stories
1 गजाली विज्ञानाच्या : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..
2 हिप्पोसारखं नाक
3 कार्टूनगाथा : ‘बोन्झो- द भू भू’
Just Now!
X