प्राची मोकाशी
‘‘अरे व्वा! बाप्पांच्या मूर्ती काय सुरेख दिसताहेत! पेशवाई फेटा, पेशवाई सिंगल लोड, पद्मासन मूर्ती, लाल गणपती, बाल गणपती..’’  गौरी आणि तिची मैत्रीण टीना गौरीच्या आईच्या  व्हॉट्सअप ग्रुपवर तिच्या मैत्रिणींनी पाठविलेल्या घरच्या गणपतींच्या मूर्ती पाहत होत्या.

‘‘ब्युटिफुल!  या सगळ्या मूर्ती तुझ्याच मामाच्या ‘श्रीविघ्नहर्ता आर्ट्स’ या कारखान्यातील आहेत ना गं!’’ टीनाने विचारलं.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…

गौरी अगदी उत्साहात ‘‘हो.’’ म्हणाली. कारण  तिच्या मामाने इंटरनेटवर ‘श्रीविघ्नहर्ता आर्ट्स’ ही बाप्पांच्या मूर्ती ऑनलाइन विक्री करण्याची वेबसाईट ‘लॉँच’ केली होती. गौरी आणि टीना गणपतीच्या या विविध मूर्ती पाहत असतानाच  प्रणवचा- तिच्या मामेभावाचा पेणहून ‘व्हॉट्सअप कॉल’ आला.

‘‘प्रणव, बाप्पांची संपूर्ण वेबसाईट भारी झालीय! तू गडबडीत असल्याने त्याविषयी तुला सांगायचं राहूनच गेलं.’’ गौरी म्हणाली.

‘‘येस्स! या वेबसाईटमुळे गणेश मूर्ती मोठय़ा प्रमाणात विकल्या गेल्या. यंदा अमेरिकेतही ऑर्डर होती आपल्या बाप्पाला..’’

‘‘‘ग्लोबल’ झालाय तुम्ही!’’ टीना हसत म्हणाली.

‘‘टीना, याचं श्रेय बाप्पाला ऑनलाइन नेण्याच्या तुझ्या कल्पनेला. आणि मुख्यत्वे तुझ्या आईला- जेनीआंटीला! त्या नसत्या तर हे अशक्य होतं. गौरे, आठवतंय नं गेल्या वर्षी..’’

‘‘ऑफ कोर्स! टीना आणि मी घरी खेळत असताना असाच तुझा ‘व्हॉट्सअप कॉल’ आला होता. करोनामुळे अनेक ठिकाणी लागलेल्या लॉकडाऊनच्या र्निबधांमुळे मूर्ती पाठवता येत नव्हत्या.’’

‘‘मूर्ती रंगवून तयार होत्या. बाबांना जाम टेन्शन आलं होतं. त्यांना कशी मदत करू तेच समजेना. आणि तेव्हाच ‘सेल ऑनलाइन’ची आयडिया टीनाने दिली.’’

‘‘आय रिमेंबर! माझ्या मॉमचा ‘ऑनलाइन हँडिक्राफ्टस्’चा मोठा बिझनेस आहे. मला वाटलं, ती नक्की तुमची हेल्प करू शकेल.’’ टीना म्हणाली.

‘‘पण तेव्हा ऑनलाइन सेल म्हणजे नक्की काय, हेच मुळी ठाऊक नव्हतं. आम्ही इतक्यांदा गोष्टी पटापटा ऑनलाइन मागवतो, पण जेव्हा विक्री करायचा विचार आला- तेही बाप्पांच्या मूर्तीची- तेव्हा धस्स झालं होतं. खरं तर आमच्या इथले काही कारखानदार नियमित करतात मूर्तीचा ‘ऑनलाइन सेल.’ पण बाबा याला कितपत तयार होतील याची मला खात्री नव्हती.’’

‘‘तरी आपला प्रयत्न यशस्वी ठरला. तू मामाला समजावलंस. मी आई-बाबांशी बोलले. टीनाने जेनीआंटीला परिस्थितीची कल्पना दिली तेव्हा ती मदत करायला लगेच तयार झाली. तिने तिच्या वेबसाईटवर आपल्या मूर्ती विकण्याची तयारी दाखवली, ही खूप मोठी गोष्ट होती.’’

‘‘आंटीने बाबांना ऑनलाइन विक्रीची पद्धत आणि निगडित व्यवहार सविस्तर समजावले. तरी बाबांना शंका होत्याच. मूर्तीच्या ऑर्डर कशा होणार, शिपिंग, पेमेंट.. एक ना दोन! पुन्हा लोक मूर्ती पाहून मगच बुकिंग करतात. ऑनलाइनमध्ये ते कसं शक्य होणार, ही तर मुख्य शंका होती त्यांना.’’

‘‘प्रणव, तुझ्या बाबांसाठी तो मोठा चेंज होता. त्यांनी तसे प्रश्न विचारणं.. इट वॉज नॅचरल!’’ टीना समंजसपणे म्हणाली.

‘‘खरंय! आठवडय़ाभरातच बाप्पांच्या विविधरंगी मूर्तीचं ‘वेबपेज’ जेनीआंटीच्या ‘स्टार हँडिक्राफ्टस्’ वेबसाईटवर झळकलं. तेव्हा बाबा म्हणाले होते, जाती-धर्मापलीकडे जेनीआंटीने माणुसकी जपली.’’

‘‘मूर्ती विकल्याही गेल्या भराभर! अर्थात ‘स्टार हँडिक्राफ्टस्’ नावाजलेली वेबसाईट असल्याचा उपयोग झाला.’’ गौरी म्हणाली.

‘‘बाप्पांच्या मूर्ती सुबक पॅकिंगमध्ये मिळाल्याची समाधानाची पोचही अनेकांनी दिली आंटीच्या वेबसाईटवर!’’- इति प्रणव.

‘‘आणि आज तुमची स्वतंत्र वेबसाईट आहे- ‘श्रीविघ्नहर्ता आर्ट्स डॉट कॉम.’’’ टीना म्हणाली.

‘‘वेबसाईट तयार करून घेतानाही जेनीआंटीने खूप मदत केलीये.’’ प्रणव कृतज्ञतेने म्हणाला.

‘‘अरे प्रणव, काय सुरेख मखरं होती वेबसाईटवर! सूर्य, कमळ, मोर, हंस.. केवढे हे प्रकार!’’ गौरी कौतुकानं म्हणाली.

‘‘आपल्या घराजवळच्या बालगणेश मूक-बधिर शाळेच्या मुलांनी बनवलेली इको-फ्रेंडली मखरं. त्यांनी रंगवलेल्या बाप्पाच्या मूर्तीही वेबसाईटवरून विकायला ठेवल्या होत्या. त्यांनाही त्यांची कला जगासमोर मांडायची संधी मिळावी- ही बाबांची कल्पना!’’

‘‘मस्तच! तेव्हा आपल्याला जेनीआंटीने मदत केली; आज तुम्ही करताय. मी कुठेतरी वाचलं होतं- चांगुलपणाची बीजं ही चांगुलपणाची जाणीव ठेवणाऱ्या मातीत रुजलेली असतात.’’ गौरी म्हणाली.

‘‘म्हणजे शाडूच्या मातीत का?’’ टीनाने निरागसपणे विचारलं. यावर दोघं खळखळून हसले.

mokashiprachi@gmail.com